घरमनोरंजनप्रेक्षकांचा 'उरी'ला तुफान प्रतिसाद, विकी झाला भावूक

प्रेक्षकांचा ‘उरी’ला तुफान प्रतिसाद, विकी झाला भावूक

Subscribe

रिलीजनंतर अवघ्या ४ दिवसांत जवळपास ३५ कोटींची कमाई केलेला 'उरी' चित्रपट लवकरच पन्नाशी गाठणार असल्याची चिन्हं आहेत.

सध्या बॉलीवूडमध्ये कुणाची हवा असेल तर तो आहे अभिनेचता विकी कौशल. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘उरी’ चित्रपटाचाच सगळीकडे बोलबाला आहे. राझी, संजू, मनमर्झियां यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेल्या विकी कौशलने ‘उरी‘ चित्रपटातही दमदार अभिनय साकारला आहे. उरी चित्रपटात विकीने भारतीय लष्करातील जवानाची भूमिका साकारली असून, या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. चित्रपटातील ‘हाऊ इज द जोश… हाय सर’ या डायलॉगने तर संपूर्ण सोशल मीडिया दणाणून सोडलं आहे. तरुणांनी या डायलॉगचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करत, उरी आणि विकी कौशलवरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या या उदंड प्रतिसादामुळे ‘उरी’ने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली आहे. चार दिवसांमध्ये जवळपास ३५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या या तुफान प्रतिसादामुळे अभिनेता विकी कौशल चांगलाच भावूक झाला आहे. एका खासगी मुलाखतीदरम्यान त्याने चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. यापुढेही माझ्यावर आणि माझ्या कामावर असेच प्रेम करत राहा, असेही विकीने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

अभिनय ठरला ‘उजवा’

रिलीजनंतर अवघ्या ४ दिवसांत जवळपास ३५ कोटींची कमाई केलेला ‘उरी’ चित्रपट लवकरच पन्नाशी गाठणार असल्याची चिन्हं आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी ‘उरी’ लवकरच १०० कोटींची कमाई करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. उरी चित्रपटातील यामी गौतम आणि विकी कौशलच्या जोडीलाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. विकी आणि यामी गौतम या दोघांच्या अभिनयाचं जितकं कौतुक होत आहे, तितकंच  चित्रपटातील अन्य कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. चित्रपटातील प्रत्येक छोट्या छोट्या पात्राने त्यांची भूमिका प्रभावीपणे वठवली आहे. चित्रपट समीक्षकांनीही ‘उरी’ चित्रपटाच्या यशामध्ये ‘अभिनय’ ही जमेची बाजू असल्याचं मत व्यक्त केलं आहे. मात्र, सर्वाधिक भाव खाऊन गेला आहे तो विकी कौशल आणि त्याने साकारलेला भारतीय जवान.

सोशल मीडियावर ‘हाय जोश’चा नारा…

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -