घरमनोरंजन'पठाण' चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये कोल्डड्रिंकवरून हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

‘पठाण’ चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये कोल्डड्रिंकवरून हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ बुधवारी (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते तर दुसरीकडे या चित्रपटाला हिंदू संघटनांकजून विरोध केला जात होता. अशातच उत्तर प्रदेशातल्या अमरोहामध्ये पठाण चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातल्या अमरोहा येथील माधौ चित्रपटगृहामध्ये पठाण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जमली होती. चित्रपट पाहण्यासाठी लोक तिकिट घेऊन चित्रपटगृहात गेले. मात्र, काही वेळानंतर चित्रपट पाहायला आलेल्या दोन गटांमध्ये कोल्ड ड्रिंकवरुन शाब्दिक वाद सुरु झाला त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या सर्व प्रकरणानंतर चित्रपटगृहाच्या मॅनेजरने सांगितलं की, “गुरूवारी रात्री चित्रपटगृहातील कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या संपल्या होत्या. एकच कोल्डड्रिंक होती. यावरून दोन गटांमध्या मारामारी झाली. त्यानंतर बाचाबाची, शिवीगाळ आणि नंतर हाणामारी झाली. त्यानंतर लाठ्या काठ्या घेऊन दोन गट एकमेकांना भिडले.”

प्रेक्षकांना ‘पठाण’ची भुरळ
अनेकांना पठाण चित्रपटाची भुरळ पडली आहे. पहिल्या तीन दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -