घरमनोरंजनअनुराग कश्यपच्या 'घोस्ट स्टोरीज' सिनेमा विरोधात गुन्हा दाखल

अनुराग कश्यपच्या ‘घोस्ट स्टोरीज’ सिनेमा विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

अनुराग कश्यप त्याच्या शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' मुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपट रिलीज होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतो. कधी चित्रपटाचे नाव तर कधी चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या कंन्टेंटमुळे सिनेमाच्या मेकर्संना संकटाना तोंड द्यावे लागते. अशातच पुन्हा एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या शॉर्ट फिल्म ‘घोस्ट स्टोरीज’ मुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. 2020 साली आलेला घोस्ट स्टोरीज हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. आणि या सिनेमा विरोधात अनुराग कश्यपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण प्रकरण

ओटीटी प्लॅटफॉमच्या नव्या नियमाअंतर्गत या फिल्मवर आक्षेप घेण्यात आला आहे. मिड डे मध्ये दिलेल्या एका वृत्तानुसार गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीने अभिनेत्री शोभीता धूलिपाला च्या एका सीनवर आक्षेप नोंदवला आहे. या सिनेमात शोभिताला गरोदर महिलेची भूमिका देण्यात आली होती आणि या महिलेचं मिसकॅरेज झाल्यानंतर शोभिताते भ्रूण खाते. तसेच या सीनची काहीच गरज नाहीये असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मेकर्सने हे सीन ॲड करण्यापुर्वी मिसकॅरेज झालेल्या महिलांना एक चेतावनी द्यायला हवी.(Filed a case against Anurag Kashyap’s ‘Ghost Stories’ movie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

- Advertisement -

ओटीटी प्लॅटफॉच्या कंटेटवर आता सेंसॉर बोर्डाची करडी नजर असणार आहे. ओटीटीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच अनेक अटी शर्थी देखील लागू करण्यात आल्या आहेत. याचे पालन करणे सर्व ओटीटी  प्लॅटफॉमंना बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – HBD: संजय दत्तचे आयुष्य चित्रपटापेक्षा कमी नाही, या घटनेमुळे सापडला होता अडचणीत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -