घरमनोरंजनFilmfare Award पासून 'द कश्मीर फाइल्स' वंचित; अनुपम खेर नाराज

Filmfare Award पासून ‘द कश्मीर फाइल्स’ वंचित; अनुपम खेर नाराज

Subscribe

फिल्मफेअर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यात द कश्मीर फाइल्स या सिनेमाला एक ही पुरस्कार मिळालेला नाही. यावरुन आता अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.अशातच त्यांनी एक क्रिप्टिक नोट सुद्धा शेअर केली आहे. खरंतर या सिनेमाला वेगवेगळ्या कॅटगरीत नॉमिनेट करण्यात आले होते. पण एक ही पुरस्कार मिळाला नाही. या सिनेमातून अनुपम खेर यांना बेस्ट अॅक्टर लीडिंग रोलसाठी नॉमिनेट केले होते. पण हा पुरस्कार बधाई दो सिनेमातील अभिनेता राजकुमार राव याला दिला गेला. त्यानंतरच अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनुपम खेर यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, ‘इज्जत एक महंगा तोहफा है इसकी उम्मीद सस्ते लोगों से न रखें!’ या पोस्टसह त्यांनी हॅशटॅगसह असे लिहिले #दकश्मीरफाइल्स

- Advertisement -

Tweet:

- Advertisement -

या पोस्टवर सिंगर शिवांग उपाध्याय याने ट्विट केले. बॉक्स ऑफिसवर लोकांकडून मिळालेली प्रशंसा आणि प्रेम यापेक्षा कोणताही मोठा पुरस्कार नाही. तर एका अन्य युजरने लिहिले की, द कश्मीर फाइल्सला लोकांनी जेवढे प्रेम दिले त्याच्या तुलनेत कोणत्याही पुरस्काराची इज्जत नाही. तिसऱ्याने लिहिले की, अग्निहोत्री यांनी नकार दिला होता खेर साहबं.

दरम्यान, अग्निहोत्री यांनी फिल्मफेअर अवॉर्ड शो च्या एक दिवस आधी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थितीत राहणार नाही असे म्हटले होते. कश्मीर फाइल्सला ७ वेगवेगळ्या कॅटेगरीत नॉमिनेट केल्यानंतर सुद्धा अग्निहोत्री यांनी या पुस्कार सोहळ्यात जाण्यास नकार दिला होता.


हेही वाचा-विवेक अग्निहोत्रींनी दिला फिल्मफेअर अवॉर्ड्स घेण्यास नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -