Video: ‘लक्ष्मी’मधील गाणं प्रदर्शित; अक्षयचं रौद्र रुप बघून येईल अंगावर काटा

या गाण्यात अक्षयचे रौद्र रूप पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्या शिवााय राहणार नाही.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित लक्ष्मी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘बम भोले’ असे या गाण्याचे शब्द असून या गाण्याच्या माध्यमातून अक्षय पहिल्यांदाच प्रेक्षकांना वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. या गाण्यात अक्षयचे रौद्र रूप पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्या शिवााय राहणार नाही.

‘बम भोले’ या गाण्यामध्ये अक्षयने लाल रंगाची साडी परिधना केली असून त्याने मोकळे केस सोडल्याचे दिसतेय. प्रदर्शित झालेल्या या गाण्यात लक्ष्मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळे अक्षयचा हा लूक प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा असल्याचे दिसतंय. दरम्यान हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या गाण्याच्या व्हिडिओला काही तासातच ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटात अक्षय एका तृतीयपंथाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री कियारा आडवाणी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘बम भोले’ गाण्याचा व्हिडिओ

कंचना या तामिळ चित्रपटाचा लक्ष्मी हा चित्रपट हिंदी रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटामध्ये ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा घेतला आहे. हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


५५ वर्षाच्या मिलिंद सोमणने पोस्ट केला Naked फोटो; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ