घरमनोरंजनराजस्थानमध्ये 'सांड की आँख' चित्रपट टॅक्स फ्री

राजस्थानमध्ये ‘सांड की आँख’ चित्रपट टॅक्स फ्री

Subscribe

राजस्थानच्या सरकारने बॉलिवूड चित्रपट ‘सांड की आँख’ करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी महिला सशक्तीकरण तसेच क्रिडावर आधारित असणारा चित्रपट ‘सांड की आँख’ राज्यातील मल्टीप्लेक्स आणि चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटावर लागणारा एसजीएसटी करांपासून सूट मिळण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

हा चित्रपट ग्रामीण शैलीतील दोन महिलांच्या जीवनातील संघर्ष कथेवर आधारलेला आहे. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्री वृद्ध शुटर्स महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही महिला जोहरी गांवातील असून या दोन्ही महिला शूटर महिला प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या भूमिकेत तापसी आणि भूमी दिसणार आहे.

- Advertisement -

हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये भूमी पेडणेकर, तापसी पन्नू आणि प्रकाश झा हे मुख्य भूमिकेत असणार आहे. राज्य सरकारने ‘सांड की आँख’ या चित्रपटाला करमुक्त करण्यापुर्वी ‘सुपर ३० ’ आणि ‘पॅडमॅन’ या चित्रपटांना करमुक्त केले होते.


Video: दमदार अभिनय असलेला ‘सांड की आंख’ चा ट्रेलर लाँच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -