घरमनोरंजनप्लॅनेट मराठीचा फिल्मफेअर पुरस्कार येत्या 30 मार्चला

प्लॅनेट मराठीचा फिल्मफेअर पुरस्कार येत्या 30 मार्चला

Subscribe

मराठी सिनेमातील चित्रपट व कलेतील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी पुन्हा एकदा येत आहे. गौरवशाली पुरस्कारांच्या या 7व्या पर्वाच्या आयोजनासाठी प्लॅनेट मराठीशी टायटल पार्टनर म्हणून सहयोग करण्यात आला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 या बहुप्रतिक्षित पुरस्कारांद्वारे 1 जानेवारी 2022 व 31 डिसेंबर 2022 या कालखंडात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील, सर्वात स्मरणीय कामांपैकी काहींचा गौरव केला जाणार आहे. यंदाच्या भव्य उत्सवात मनोरंजक नाट्ये, जादूई क्षण आणि नेत्रसुखद विजय बघायला मिळणार आहेत. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालीदास नाट्यमंदिरात 30 मार्च 2023 रोजी रंगणार आहे. मानाची पुरस्कार रजनी पात्र विजेत्यांना प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या ब्लॅक लेडीने सन्मानित करणार आहे.

या बहुप्रतिक्षित सोहळ्याची सुरुवात म्हणून 23 मार्च 2023 रोजी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिभावंत कलावंत आणि देखणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख व संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या साथीने नवीन पर्वाच्या शुभारंभासाठी दीप प्रज्ज्वलित केला. त्यानंतर माध्यमाच्या प्रतिनिधींना संबोधित करण्यात आले आणि आगामी पुरस्कार सोहळ्याची एक झलक त्यांना दाखवण्यात आली.

- Advertisement -

प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 हा प्रेक्षकांसाठी गुदगुल्या करणारा अनुभव ठरणार आहे. कारण सूत्रसंचालनाची धुरा अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर आहे. त्यांची विनोदाची चपखल समज सर्वांना हसवणार यात शंकाच नाही. वैदेही परशुरामी, पूजा सावंत आणि अमृता खानविलकर या अभिजात सौंदर्यवती त्यांच्या चैतन्याने सळसळणाऱ्या सादरीकरणांनी प्रेक्षकांवर गारुड करणार आहेत आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत. प्रतिभावान कलावंत श्रेयस तळपदेचे एक प्रभावी सादरीकरणही यावेळी बघायला मिळणार आहे. शिवाय या रजनीमध्ये आणखी दोन रोमांचक सादरीकरणे होणार आहेत. यातील एक देखणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे, तर दुसरे अंकुश चौधरी आणि सना शिंदे करणार आहेत.

प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 म्हणजे मनोरंजन व हास्याने परिपूर्ण अशा प्रसन्न संध्याकाळची हमी आहे. वर्ल्डवाइड मीडियाचे सीईओ दीपक लांबा, पुरस्कारांच्या या आगामी पर्वाबद्दल म्हणाले की, “आपल्याला खिळवून ठेवणाऱ्या कथा व समृद्ध सादरीकरण यांच्या जोरावर गेल्या अनेक दशकांत मराठी सिनेमा सिनेमॅटिक उत्कृष्टतेची खाण म्हणून उदयाला आला आहे. आपल्या अपवादात्मक प्रतिभेच्या माध्यमातून कथा पडद्यावर जिवंत करून प्रेक्षकांवर कधीच पुसला न जाणारा ठसा उमटवणाऱ्या या अप्रतिम कलाकृतींमागील प्रतिभावंत द्रष्ट्यांची कला फिल्मफेअर केवळ साजरी करत नाही, तर या कलेचा सन्मान करते. प्लॅनेट मराठी ओटीटीसोबत दीर्घकाळापासून असलेला सहयोग आणखी पुढे नेता आला याचा आम्हाला आनंद वाटतो. यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांना एका खऱ्या अर्थाने अविस्मरणीय रजनीचा अनुभव घेता येणार आहे.”

- Advertisement -

फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई आगामी सोहळ्याबद्दल वाटणारा रोमांच व्यक्त करताना म्हणाले की, “ब्लॅक लेडी हे गेल्या अनेक दशकांपासून भारतीय सिनेमातील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे आणि मागील सहा पर्व प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता या पुरस्कारांचे 7वे पर्व घेऊन येणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे. मराठी सिनेमाने समृद्ध वारसा, बहुपदरी सादरीकरण व कालातीत कथा यांच्या माध्यमातून चित्रपट प्रेमींच्या अनेक पिढ्यांची मने जिंकली आहेत. मराठी सिनेमाचा विख्यात वारसा यामागे आहे. सिनेमॅटिक उत्कृष्टतेला केलेल्या वंदनासाठी कायम स्मरणात राहील असा एक खिळवून टाकणारा सोहळा आखण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

प्लॅनेट मराठी ओटीटीचे संस्थापक व प्रमुख अक्षय बर्दापूरकर फिल्मफेअरसोबतच्या सहयोगाबद्दल म्हणाले की, “फिल्मफेअर पुरस्कार हे आपल्या देशातील सिनेमॅटिक कामाला दिल्या जाणाऱ्या सर्वात प्रतिष्ठेच्या मान्यतांपैकी एक असून, याचे लक्षावधी चाहते आहेत. हे पुरस्कार उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान तर करतातच, शिवाय अनेक नवोदित प्रतिभावंतांना आपल्या सीमा विस्तारून ही प्रतिष्ठेची ब्लॅक लेडी घरी घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देणारा तो एक स्रोत आहे. आपल्या विस्तृत उत्पादनांच्या माध्यमातून मराठी चित्रपट उद्योगाला बढावा देण्यात व प्रोत्साहन देण्यात प्लॅनेट मराठी ओटीटी कायमच अग्रभागी राहिले आहे आणि आपल्या मान्यतेच्या माध्यमातून उद्योगाचे यश साजरे करणाऱ्या फिल्मफेअरशी पुन्हा एकदा सहयोग करणे आमच्यासाठी आनंददायी आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 या 7व्या पर्वासाठी त्यांच्याशी सहयोग करता आला याचा आम्हाला खूप आनंद व अभिमान वाटतो. आमचा सहयोग पुन्हा एकदा भव्य यश मिळवेल अशी खात्री आम्हाला वाटते. मराठी सिनेमा संपूर्ण जगात पोहोचवण्याचे उद्दिष्ट प्लॅनेट मराठीपुढे आहे आणि यासाठी संप्रेरकाची भूमिका फिल्मफेअरशिवाय दुसरे कोणी अधिक चांगली करूच शकणार नाही.”

प्रतिभावान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की, “मराठी सिनेमातील सर्वोत्कृष्ट कलाप्रतिभा साजरी करणाऱ्या या लोकप्रिय व भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान व संधी पुन्हा एकदा मिळणे माझ्यासाठी थरारून टाकणारा अनुभव आहे. फिल्मफेअर हा भारतीय सिनेमाचा आधारस्तंभ आहे आणि कलावंतांना त्यांचे सर्वोत्तम देऊन प्रतिष्ठेची ब्लॅक लेडी हातात घेण्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी हा प्रेरणेचा स्रोत आहे.”

फिल्मफेअर विषयी
60 वर्षांहून अधिक काळापासून बॉलिवूडच्या निस्सिम चाहत्यांसाठी फिल्मफेअर हे अंतिम लक्ष्य ठरत आहे. ब्रॅण्डने आपला समृद्ध वारसा अनेकविध फॉरमॅट्स, मार्ग व अनुभवांपर्यंत विस्तारला आहे आणि एक्स्लुजिव मुलाखती, क्लासी फोटो शूट्स, आतील गोष्टी, स्नीक पीक्स, फॅशनविषयक बातम्या, चित्रपट परीक्षणे व विशेष वृत्तांतांच्या माध्यमातून चित्रपटांच्या चाहत्यांना अद्ययावत ठेवले आहे. फिल्मफेअर बॉलिवूडच्या सर्वांत मोठ्या ताऱ्यांचे रंगीत, प्रांजळ, सुंदर, विचित्र आणि काहीवेळा अगदी गालबोट लागलेली आयुष्येही तंतोतंत टिपते. फिल्मफेअर अवॉर्ड्स ही फिल्मफेअरची फ्लॅगशिप प्रॉपर्टी म्हणजे भारतीय सिनेमा उद्योगातील गुणवत्तेचा मापदंड आहे. 1953 साली स्थापना झाल्यापासून याद्वारे सर्वोत्तम प्रतिभेला मान्यता दिली जात आहे. शिवाय, फिल्मफेअरने या मानाच्या सोहळ्याचा विस्तार, मराठी, पंजाबी, बंगाली, तमीळ, तेलुगू, कन्नडा व मल्याळम सिनेमाच्या, प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये यशस्वीरित्या केला आहे. 2020 मध्ये फिल्मफेअरने भारतीय ओटीटी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि ‘ब्लॅक लेडी’ भारतातील सर्व मनोरंजन क्षेत्रांतील मान्यतेचा सर्वाधिक इच्छित प्रतीक झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -