Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Filmfare Awards 2021 : थप्पड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, अभिनेता इरफान खानचा मरणोत्तर...

Filmfare Awards 2021 : थप्पड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, अभिनेता इरफान खानचा मरणोत्तर सन्मान

तर अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा सिनेमा फिल्मफेअर अवॉर्ड २०२१चा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला.

Related Story

- Advertisement -

चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सोहळा म्हणजेच फिल्म फेअर अवॉर्ड. कलाकरांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड अत्यंत महत्त्वाचा असतो. नुकताच फिल्म फेअर अवॉर्ड २०२१ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाच्या काळात संपूर्ण चित्रपटसृष्टी बडघाईला आली. मात्र पुन्हा एकदा कलाकार नवे सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. फिल्म फेअर अवॉर्ड २०२१ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अभिनेता रितेश देशमुख आणि राजकुमार राव यांनी फिल्मफेअर २०२१च्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. यंदाच्या फिल्म फेअर अवॉर्डमध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानचा मरणोत्तर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इरफान खानच्या अंग्रेजी मीडियम सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेत्री तापसी पन्नूचा थप्पड हा सिनेमा फिल्मफेअर अवॉर्ड २०२१चा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. त्याचप्रमाणे तान्हाजी सिनेमानेही फिल्मफेअरमध्ये मान पटकवला आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूला थप्पड या सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला. तर मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याला तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे तान्हाजी सिनेमासाठी अभिनेता सैफ अली खानला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. सिनेमातील सर्वोत्कृष्ट साहसदृश्यांसाठीही तान्हाजी – द अनसंग वॉरिअर या सिनेमाची निवड करण्यात आली.रोहेना गेराला सर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. तर गुलाबो सिताबो या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री,संवाद,छायाचित्रण,वेशभूषेशासाठी पुरस्कार मिळाला.

- Advertisement -

कोरोनाच्या काळात बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. फिल्मफेअर अवॉर्डच्या निमित्ताने सर्व कलाकारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. बॉलिवूड सिनेमा आणि कलाकार पुन्हा एकदा नव्या वर्षांत प्रेक्षकांसाठी नवे सिनेमे घेऊन यायला सज्ज झाले आहेत.


हेही वाचा – रणबीर कपूरची कोरोनावर मात

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -