घरमनोरंजनसुप्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं निधन

सुप्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचं निधन

Subscribe

सुप्रसिद्ध निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाजमी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णायात त्यांनी ६४ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

चित्रपट दिग्दर्शक, सुप्रसिद्ध निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाजमी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आज पहाटे ४.३० वाजता मुंबईतील कोकीलाबेन रुग्णायात त्यांनी ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडमधील कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे.

कल्पना लाजमीविषयी थोडस…

कल्पना लाजमी या प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांच्या कन्या होत्या. तर चित्रपट निर्माते गुरुदत्त हे कल्पना यांचे मामा होते. तर सुप्रसिद्ध गायक भूपेन हजारिका हे त्यांचे जवळचे मित्र होते. कल्पना लाजमी यांना प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित ‘रुदाली’ चित्रपटानं एक वेगळी ओळख दिली होती. त्याशिवाय ‘एक पल’, ‘दरमिया’, क्यों?, दामन आणि ‘चिंगारी’ सारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपली छाप टाकली होती. तर निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतून सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. त्यासोबत त्यांनी अनेक माहितीपटांचंही दिग्दर्शन देखील केलं होतं. तसेच लाजमी यांनी हजारिका यांच्या आयुष्यावर ‘भूपेन हजारिका: अॅज आय न्यू हिम’ नावाचं पुस्तकही लिहिलं होत.

- Advertisement -

लाजमी यांनी दिली आजाराशी झुंज

सुप्रसिद्ध निर्मात्या कल्पना लाजमी यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला होता. गेल्या काही वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. सततचे आजार आणि कामापासून दूर राहिल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील खालावली होती. त्यांना अभिनेता अमिर खाननं आर्थिक मदतही केली होती. मात्र अखेर आज उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -