महागाईपासून लक्ष हटवण्यासाठी चित्रपटांवर टाकला जातोय बहिष्कार… अनुराग कश्यप

अनुराग कश्यप यांनी म्हटलं की, आज देशभरामध्ये प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे लोकांकडे पैसे कसे वाचतील. सोबत अनुराग कश्यपने टॉलिवूड चित्रपट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत देखील आपलं मत मांडलं.

अनुराग कश्यप सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा दोबारा चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे . दरम्यान, सध्या अनुराग कश्यप चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेट देत आहे. यावेळी एका इंटरव्यूमध्ये अनुराग कश्यपने बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर असफल होत असल्याबाबत आपलं मत मांडलं आहे. अनुराग कश्यप यांनी म्हटलं की, आज देशभरामध्ये प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे लोकांकडे पैसे कसे वाचतील. सोबत अनुराग कश्यपने टॉलिवूड चित्रपट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत देखील आपलं मत मांडलं.

बॉलिवूडमध्ये प्रत्येक प्रकारचे चित्रपट
अनुराग कश्यपने या इंटरव्यूमध्ये म्हटलं की, इंडस्ट्रीची जेवढी खराब स्थिती सांगितली जाते. खरंतर तितकी नाही. चित्रपट निर्माते फक्त मीडियाकडून बनवल्या गेलेल्या खोट्या गोष्टीमुळे घाबरतात आणि त्यांना घाबरवलं जात आहे. आज सुद्धा बॉलिवूडमध्ये प्रत्येक प्रकारचे चित्रपट तयार केले जात आहेत. परंतु प्रेक्षकांच्या मनात मोठ्या चित्रपटांबाबत आधीपासूनचं एक नरेटिव सेट केलं जात आहे.

GST पासून लक्ष हटवण्यासाठी बहिष्काराची मागणी
टॉलिवूड चित्रपटांवर बोलताना अनुराग कश्यप यांनी सांगितलं की, लोकांना कसं माहित की तो चित्रपट चालत आहे? खरं सांगायचं तर गेल्या आठवड्यात कोणता चित्रपट प्रदर्शित झाला हे सुद्धा त्यांना ठाऊक नसतं. तिथे सुद्धा बॉलिवूडसारखीच स्थिती आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत कारण, त्यांच्याकडे पैसे नाहीत. आज देशामध्ये पनीरपासून प्रत्येक वस्तूला GST लावण्यात आला आहे. महागाई आभाळापर्यंत पोहोचत आहे. सामान्य माणसाला यापासून सुटका मिळेल, तेव्हाच तो चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकेल. या सगळ्या गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.


हेही वाचा :खरा माणूस कुणाच्या बापाला भेत नाय…किरण मानेंची पोस्ट चर्चेत