Ratris Khel Chale 3 : रात्रीस खेळ चाले ३ मध्ये अखेर ‘वच्छी’ची एंट्री ; प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न सुटणार ?

Finally, the entry of 'Vachchhi' in Ratris khel chale part 3
Ratris Khel Chale 3 : रात्रीस खेळ चाले ३ मध्ये अखेर 'वच्छी'ची एंट्री ; प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न सुटणार ?

मराठी टेलिव्हिजनवरील रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्य़ावर उचलून धरले. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, सुशल्या या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या यशामुळे रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला.मात्र अजूनही ‘वच्छी’ची एंट्री गुलदस्त्यात होती.

अखेर मालिका सुरु होऊन बऱ्याच कालावधीनंतर चाहत्यांच्या मनातील प्रश्नांचा गुंता सुटणार आहे.कारण ‘ती परत येतेय’ म्हणजेच ‘वच्छी’ परत येतेय.

नाईकांच्या वाड्याची ज्या व्यक्तीला हव्यास होती ती व्यक्ती म्हणजे ‘वच्छी’.आता मालिकेतील वच्छीची भूमिका काय असणार ? काशीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी ती परत आली आहे का ? खरंच माईच्या पाठीशी उभी राहणार का?

अशा एक आणि अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन ‘वच्छी परत येतेय.’ वच्छीच्या एंट्रीने मालिकेमध्ये वेगळी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत वच्छी ही भूमिका साकारून अभिनेत्री संजीवनी पाटील हीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. विशेष म्हणजे आजही वच्छीचा लग्नातील मिरवणुकीचा डान्स प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

अतरंगी स्टाइलमध्ये डान्स करत वच्छीने तिच्या मुलाच्या लग्नाची वरात अण्णा नाईकांच्या वाड्यात आणली होती. त्यामुळे चाहते कायमच तिच्या डान्स व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.


हे ही वाचा – प्रिती झिंटानंतर सलमानला लागले पिता होण्याचे वेध, सरोगेसी करतोय प्लान