घरमनोरंजनबिग बॉसच्या माजी स्पर्धकाची मॉडेलला मारहाण; तक्रार दाखल

बिग बॉसच्या माजी स्पर्धकाची मॉडेलला मारहाण; तक्रार दाखल

Subscribe

नवी मुंबईतील एका फॅशन शो कार्यक्रमांच्या दरम्यान एजाजने गोंधळ घालून शो च्या आयोजकांसह मॉडेलला केली मारहान

बिग बॉसच्या आठव्या पर्वातील एजाज खान नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतांना दिसतो. आता ही तो पुन्हा चर्चेत आहे. नवी मुंबईतील एका फॅशन शो कार्यक्रमांच्या दरम्यान एजाजने गोंधळ घालून शो च्या आयोजकांना मारले. एवढेच नाही तर तेथील मॉडेलला ही मारहान केली. या घटनेनंतर एजाजच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते.

एजाज कायम कोणत्या न् कोणत्या गोष्टींमुळे चर्चेमध्ये असतो. यापुर्वी मागील वर्षात एजाज जवळ प्रतिबंध असणारे ड्रग्सच्या गोळ्या सापडल्या होत्या त्याची किंमत २ लाखांहून अधिक होती. यावेळी त्याला अटक करण्यात आली तेव्हा नशेच्या अवस्थेत होता. ज्यावेळी त्याला अटक करण्यात आली त्यावेळी साधारण ४० दिवस जेलमध्ये राहिला होता.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या विरोधात एजाज नेहमी वक्तव्य करत असतो. त्याने नोटाबंदी पासून जीएसटी पर्यंत पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घरात असताना पंतप्रधानाना चोर असे संबोधल्याने त्यावेळीही त्याच्यावर एफआयआरची नोंद केली होती. २०१६ साली त्याच्यावर हेयर स्टाइलिस्टला अश्लील फोटो पाठवण्याचा आरोप लावण्यात आला होता, त्याला अटक करण्यात आले होते. त्यानंतर दहा हजार रूपये देऊन मुंबई कोर्टातून एजाजने जामीन मिळवण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

You will never change your life until you change something you do daily. Good day yaro ?❤️ pic @vishalsaxenaphotography

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan) on

- Advertisement -

एजाजने बॉलिवूडच्या रक्‍त चरित्र, नायक आणि रब,अल्लाह के बंदे अशा चित्रपटात काम केले होते. यानंतर एजाज खानने बिगबॉसच्या सातव्या आणि आठव्या पर्वात वाईल्ड कार्डने प्रवेश केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -