घरमनोरंजनरिलीजच्या पहिल्याच दिवशी 'भोंगा' चित्रपट थिएटरमधून हटवला; अमेय खोपकरांचा आरोप

रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून हटवला; अमेय खोपकरांचा आरोप

Subscribe

माशिदींवरील भोग्यांवर आधारित ‘भोंगा’ चित्रपटाला चित्रपटाच्या प्रदार्शनापूर्वीच जोरदार प्रसिद्धी मिळाली आहे. खरंतर ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटाने जोर दिला असून या पार्श्वभूमीवर ‘भोंगा’ हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. ‘भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे’ हा आशयघन विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेच्या नेत्यांनी या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण केले आहे. मनसेचे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त असलेला हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित झाला आहे, मात्र आता हा चित्रपट चित्रपटगृहातून काढले जात असल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे.

अमेय खोपकरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे,

- Advertisement -

 

- Advertisement -

हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे यांनी लिहिली असून चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार यांनी लिहिले आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत. निर्माता, अभिनेता अमोल कागणेने याआधी ‘हलाल’ , ‘लेथ जोशी’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली होती, त्यांच्या ‘भोंगा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेता सिनेमा, फिल्मफेअर बेस्ट फिल्म क्रिटिक २०२२ , इंडिअन इंटरनॅशनल बेस्ट फिल्म, पुणे इंटरनॅशनल बेस्ट मराठी फिल्म, महाराष्ट्र स्टेट अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, सोशल फिल्म अँड स्टोरी हे पुरस्कार या आशयघन चित्रपटाला मिळाले आहेत.

 

 

 


हेही वाचा :‘लंडन मिसळ’चा झणझणीत तडका ; चित्रपटाचं पोस्टर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -