गुरू उठा ले अस्त्र जब । करे पाप का नाश…..’ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक शेअर

अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे शुटींग आता पूर्ण झाले असून, आलिया आणि रणबीर, अमिताभ आणि मौनी रॉय या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येतील

‘ब्रम्हास्त्र’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच धर्मा प्रोडक्शनने रणवीर आणि आलियानंतर महानायक अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांचा हा फर्स्ट लूक प्रेक्षकांना खूप भावला आहे. सोशल मीडियावर अमिताभ यांचा हा लूक प्रचंड व्हायरल होत असून त्यांचे चाहते या फोटोवर उत्तम प्रतिसाद देत आहेत.

प्रेक्षकांना भावला अमिताभचा फर्स्ट लूक


धर्मा प्रोडक्शन्स द्वारा सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन पांढऱ्या दाढी आणि केसांमध्ये दिसत आहे. पोस्टरमधील त्यांच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखमेचे डाग दिसत आहेत. ज्यातून रक्त निघत आहे. शिवाय त्यांच्या हातामध्ये एक तलवार सुद्धा दिसत आहे. मात्र त्यांच्या हातातील तलवार सामान्य तलवार नसून एक अद्भूत अस्त्र असल्यासारखे वाटत आहे.

करण जौहरने केला फर्स्ट लूक

करण जौहरने चित्रपटातील अमिताभचा फर्स्ट लूक शेअर करत फोटोसह खाली एक कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “गुरू है गंगा ज्ञान की । काटे भाव का पाश , गुरू उठा ले अस्त्र जब । करे पाप का नाश”.

या पूर्वीच चित्रपटाचे टीझर लाँन्च करण्यात आले आहे.
अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाचे शुटींग आता पूर्ण झाले असून, आलिया आणि रणबीर, अमिताभ आणि मौनी रॉय या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येतील. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :नयनताराच्या लग्नात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकारसुद्धा लावणार हजेरी