घरमनोरंजनआधी मक्का आणि आता वैष्णोदेवी; 'पठाण'च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख देतोय धार्मिक स्थळांना भेट

आधी मक्का आणि आता वैष्णोदेवी; ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख देतोय धार्मिक स्थळांना भेट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवळपास 4-5 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा चित्रपटामध्ये झळकणार आहे. याचं निमित्ताने शाहरुख खान माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख वैष्णोदेवी समोर नतमस्तक झाला.

शाहरुखने घेतले वैष्णोदेवीचे दर्शन
शाहरुख खान रविवारी रात्री वैष्णोदेवीच्या मंदिरात पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार,शाहरुख रविवारी जम्मूच्या कटरा येथे पोहोचला होता तिथल्या एका हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो वैष्णोदेवी भवनकडे रवाना झाला.शाहरुख जवळपास रात्री 12 च्या सुमाराच्या वैष्णोदेवीच्या मंदिरात पोहोचला. यावेळचा शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee News (@zeenews)

- Advertisement -

या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखने काळ्या रंगाचे जॅकेट घातले असून चेहऱ्यावर मास्क लावला आहे. शाहरुखचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून त्याच्या चाहते आनंदी झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने मक्का येथे उमराह केला होता. असे म्हटलं जातंय की, चित्रपटांमधून मोठी विश्रांती घेतल्यानंतर आता पुनरागमन करत असलेल्या शाहरुख खानला पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायची आहे. त्यामुळे तो धार्मिक स्थळांना भेट देऊन आणखी चित्रपटांसाठी आर्शिवाद घेत आहे.

25 जानेवारी रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
शाहरुख खानचा हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

- Advertisement -

‘डंकी’ आणि ‘जवान’मध्ये देखील दिसणार शाहरुख
शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटापूर्वी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असतील तर, ‘जवान’मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असेल.

 


हेही वाचा :

बॉलिवूडचा बाप आला… बेशर्म गाण्यातील शाहरुखच्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -