आधी चक्कर आली, मग दातखिळी बसली; मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

bhagyashree mote

पिंपरी चिंचवड – अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची बहिण मधू मार्कण्डेय हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू नैसर्गिक नसून घातापात असण्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

नेमकं काय झालं?

भाग्यश्री मोटे हिची बहिण मधू मार्कण्डेय ही पुण्यातील वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करत होती. रविवारी ती एका मैत्रीणीसोबत भाड्याने घर पाहण्यासाठी गेली होती. तिथे तिला अचानक चक्कर आली. तसंच, तिची दातखिळीही बसली.त्यामुळे तिच्या मैत्रीणीने तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तिला य़शवंतारव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)


तिच्या कुटुंबियांना याबाबत कळलं तेव्हा मोठा धक्का बसलाच. कारण, तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तिच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास घेतला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

दरम्यान, बहिणीच्या मृत्यूनंतर अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने सोशल मीडियावर तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला! माझी आई, बहीण, मैत्रीण, विश्वासू आणि काय नव्हतीस तू माझ्यासाठी? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू? तू मला ते कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. मी कधीच असं करणार नाही. कधीच नाही, अशी भावनिक पोस्ट भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)