Friday, June 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा दिली तेजश्रीने प्रतिक्रिया; म्हणाली, आमच्यात...

आशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा दिली तेजश्रीने प्रतिक्रिया; म्हणाली, आमच्यात…

दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे अंदाज त्यांच्या चाहत्यांकडून लावण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

अग्गंबाई सासूबाई (Agga Bai Sasubai) फेम बबड्या आणि शुभ्रा यांची जोडी सध्या फारच चर्चेत आहे. दोघेही सध्या एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. मालिकेतील बबड्या आणि शुभ्रा त्यांच्या खऱ्या आयुष्यातही तितकेच एकमेकांचे फार जवळचे मित्र आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की (Ashitosh patki) आणि शुभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधान (Tejashree pradhan) यांच्या नात्यात काही तरी खास असल्याचे सर्वाना वाटत आहे. तेजश्रीच्या वाढदिवसादिवशी आशुतोषने शेअर केलेल्या पोस्टमधून तसे दिसून आले आहे. त्यामुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे अंदाज त्यांच्या चाहत्यांकडून लावण्यात येत आहे. (first time Marathi Actress Tejashree pradhan has reacted to his relationship with actor Ashitosh patki)

- Advertisement -

तेजश्रीच्या वाढदिवसादिवशी आशुतोषने तिला ‘भुतकाळ विसरुन जा,कारण आपण तो बदलू शकत नाही’,अशी एक पोस्ट लिहित दोघांचा फोटो शेअर करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोनंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तेजश्रीला आशुतोष आणि तिच्या नात्याविषयी विचारले असता, ‘आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. आशुतोष माझा फार जवळचा मित्र आहे म्हणून त्याने माझ्या वाढदिवसाला तो फोटो शेअर केला होता. आमच्यात मैत्रीपलीकडे काहीच नाही’, असे तेजश्रीने म्हटले आहे.


लग्नाविषयी तेजश्रीला विचारले असता,’मला लवकरात लवकर लग्न करुन सेटल व्हायला आवडेल. मला कोणी चांगला मुलगा मिळाला तर मी सहा महिन्यात त्याच्यासोबत लग्न करेन. पण त्याने मला प्रपोज करायला हवे असे मला पहिल्यापासून वाटते. मुलगा सिनेसृष्टीतील असेल तरीही मला चालेल’, असे तेजश्रीने म्हटले आहे.

- Advertisement -

अग्गं बाई सासुबाई मालिकेतील सोहम आणि शुभ्रा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेजश्री आणि आशुतोषला पुन्हा एकदा ऑनस्क्रिन पहाण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. सध्याच्या परस्थितीमुळे मी थोडा ब्रेक घेतला आहे. मला आणखी नव्या मालिकेत काम करायला आवडेल, असे तेजश्रीने म्हटले आहे.


हेही वाचा – VootSeires: ‘ख्‍वाबों के परिंदे’मध्‍ये पाहा मैत्रीचा रोमांचपूर्ण प्रवास

 

- Advertisement -