मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर ‘रुपाली राज्याध्यक्ष’ ची भूमिका साकारतात आहेत. त्या कामामध्ये व्यस्त असूनही फिटनेस आणि निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात या बाबतीत त्यांनी काही टीप्स सांगितल्या आहेत. ऐश्वर्या नारकर या गेल्या वीस वर्षापासून जिम व वेट ट्रेनिंग करत आहेत आणि नुकताच त्यांनी योगा करायला देखील सुरवात केली आहे. त्यांच्या सुंदर त्वचेचे व दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध आहारचं आहे.
या फिटनेस जीवनशैलीला घेऊन त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून मी रोज अंदाजे ३० – ४० मिनिटं योग करते ज्याने मला स्फुर्ती आणि मनाची शांती मिळते. योग मी माझ्या पुतणी कडून शिकत आहे जी एक योग प्रशिक्षक आहे. व्यायाम करण्यासोबत मी पौष्टिककरा आहार देखील घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते शिवाय माझा सगळा आहार शुद्ध तुपामध्ये बनला जातो. भात हा पदार्थ माझ्या आहारात लहानपणापासून आहे. सगळ्यांना मी एवढेच सांगेन की तुमच्या लहानपणीच्या खाण्याच्या आवडी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले की आपलं आरोग्य निरोगी राहतं. माझ्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे.” असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.
हेही वाचा :