Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक NCPA निर्मित लोककला पुनर्जीवित करणाऱ्या "कलगीतुरा" नाटकाचा नाशकात होणार शुभारंभ

NCPA निर्मित लोककला पुनर्जीवित करणाऱ्या “कलगीतुरा” नाटकाचा नाशकात होणार शुभारंभ

Subscribe

नाशिक : भारतीय कलावर्तुळात सन्मानाचे स्थान असलेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई अर्थात NCPA संस्था आयोजित दर्पण या मराठी नाट्यलेखन उपक्रमातील विजेत्या, दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित कलगीतुरा या एनसीपीएनिर्मित नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २० ऑगस्ट रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे. कलगीतुरा नाटकाच्या निमित्ताने एनसीपीए सुमारे एक तपाहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच मराठी व्यावसायिक नाटकाची निर्मिती केली असल्याची माहिती एनसीपीएचे चित्रपट व नाट्यविभाग प्रमुख ब्रूस गुथ्री व कार्यक्रम विभागाच्या सहव्यवस्थापक तथा कलगीतुराच्या निर्मात्या राजेश्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक यासारख्या एकाहून एक सरस नाटके मराठी प्रायोगिक रंगभूमीला देणार्‍या दत्ता पाटील व सचिन शिंदे यांच्या यशस्वी जोडीचे कलगीतुरा हे नवे नाटकही रंगभूमी गाजवते आहे, त्यांना ऋषिकेश शेलार यांच्या मोहक संगीताची साथ लाभली आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे म्हणाले की, आम्ही या पारंपारिक कलाप्रकारावर सखोल संशोधन करून एक साधे, पण प्रभावी सादरीकरण करावे, हाच ’कलगीतुरा’ करण्यामागे आमचा उद्देश होता. यातील साधेपणा अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कलाकार शोधून आणले.

- Advertisement -

राजश्री शिंदे म्हणाल्या की, सोशल मीडियाच्या युगात लोकपरंपरा व कला लोकांपर्यंत पोहोचवणे एनसीपीएसाठी खूप महत्वाचे आहे. मरणासन्न अवस्थेतील कलेला पुनरुज्जीवन देऊन पुढील अनेक वर्षे ती टिकवून ठेवण्यासाठी कलगीतुरा हे नाट्य हक्काचे व्यासपीठ ठरले. कलगीतुराला लाभलेला गावाकडच्या मातीतील सुरांचा अस्सल स्पर्श प्रेक्षकांच्या मनात भरून उरतो. यातील प्रतिभावान कलाकार, आशयघन कथानक व भावपूर्ण संगीत अविस्मरणीय अनुभव देते.

काय आहे कलगीतुरा ?

कलगी म्हणजे शक्ती, तुरा म्हणजे शिव.म्हणजेच कलगीतुरा. कसंही श्रेष्ठ की तुरा श्रेष्ठ असा शाहिरी गायनातून होणारा हा अनोखा झगडा ही गावची प्रबोधनात्मक करमणूक असायची. शिवाय गावातील एखाद्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास रात्रभर त्याकुटुंबाच्या सोबतीला राहणारे, तिथे बसून कलगीतुरा गाणारे त्या दुःखाला राखायला जायचे. पण जसजसे जीवन सुखकर व समृद्ध होऊ लागले तेव्हा जुन्या प्रथा-परंपरा कालबाह्य वाटू लागल्या. वेगवान जीवनशैलीत जुने मूल्यात्मक तत्व जोपासायला कुणाकडे वेळ आणि इच्छादेखील उरली नाही. परिणामी खेड्यातील कलगीतुरा अस्तंगत झाला. परंतु, कलात्मक मूल्य असलेल्या नव्या तरूणांनी ही दोन दशके लोप पावलेली परंपरा पुनरूज्जिवित केली. आजच्या अस्वस्थ काळात दुःख राखणीला जाणे पुन्हा सुरू झाले. या नाटकात कलगीतुराच्या या पुनरुत्थानाचा संगीतमय प्रवास मांडलाय. यातील सर्व कलावंत व तंत्रज्ञ नाशिकचे आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -