HomeमनोरंजनMahakumbh Stampede : महाकुंभातील दुर्घटनेवर प्रसिद्ध लोकगायिकेची संतप्त प्रतिक्रिया

Mahakumbh Stampede : महाकुंभातील दुर्घटनेवर प्रसिद्ध लोकगायिकेची संतप्त प्रतिक्रिया

Subscribe

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात मौनी अमावास्येच्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा जीव गेला तर काही गंभीर स्वरूपात जखमी झाले. दरम्यान, सामान्य जनतेचे गर्दीत हाल सुरू असताना प्रशासन भाजपच्या नेत्यांना VIP स्नान उपलब्ध करून देतय, असा आरोप प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंग राठोडने केला. याविषयी संताप व्यक्त करताना तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने धीरेंद्र शास्त्रींवरसुद्धा पलटवार केला आहे. (Folk singer Neha Rathore angry reaction on Mahakumbh stampede)

काय म्हणाली नेहा सिंग राठोड?

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या या दुर्घटनेबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच कुंभमेळ्यातील बरेच फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले आहेत. ज्यात सामान्य जनतेसोबत राजकीय नेते आणि संत महात्म्यांचेदेखील फोटो तसेच व्हिडिओंचा समावेश आहे. यावर लोकगायिका नेहा सिंग राठोरने प्रतिक्रिया देत ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘भाजप सरकारने कुंभमेळ्यातून केवळ पाप कमावले आहे. मेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या मृत्यूचे पातक सरकारच्या माथी मारायला हवे’.

या व्हिडिओत नेहाने असेही म्हटले, ‘सामान्य जनता चेंगराचेंगरीत मरतेय आणि प्रशासन मात्र भाजपच्या नेत्यांना व्हीआयपी स्नान उपलब्ध करून देण्यात व्यस्त आहे. हे आहे कुंभमेळ्याचे सत्य. भाबड्या जनतेला महाकुंभमध्ये बोलावून मरायला सोडून देणारे यांचे सरकार फार महान आहे आणि यांच्या वाईट व्यवस्थापनावर प्रश्न उठवणारे लोक सनातन विरोधी आणि गिधाड आहेत. होय ना?’

‘होय!! भाजपचे आयटी सेल कुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीवर प्रश्न विचारणाऱ्यांना गिधाड म्हणतायत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार भोळ्या जनतेला मरायला सोडून देणारे भाजपाचे हे नेते महान संत आहेत. कुंभसारख्या आस्था पर्वाला राजनीतीचे आयोजन बनवणाऱ्या लोकांना प्रश्न का नाही विचारत? जनतेला मरायला सोडणाऱ्यांना प्रश्न का नाही विचारत? या मेळ्यातून सरकारने केवळ पाप कमावलंय आणि चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृत्यूचा दोष या सरकारलाच द्यावा, असे मी स्पष्टपणे सांगेन’.

धीरेंद्र शास्त्रींवर शाब्दिक पलटवार

बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले होते की, ‘जो महाकुंभमध्ये येत नाही तो देशद्रोही आहे’. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत नेहा सिंग राठोडने लिहिले, ‘माझा सख्खा भाऊ सैन्यात आहे आणि तो स्वतःचे कर्तव्य बजावतोय. तो महाकुंभ स्नान करायला येऊ शकत नाही’.

‘मग अशावेळी त्याला देशद्रोही म्हणाल का? देशाची एव्हढी मोठी लोकसंख्या महाकुंभाला येऊ शकणार नाही… मग ही संपूर्ण जनता देशद्रोही आहे का? हे बाबा कोणत्या आधारावर देशातील करोडो लोकांना देशद्रोही म्हणाले?

हेही पहा –

Sunita Ahuja : नवऱ्यांवर विश्वास ठेवू नये, गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?