घरमनोरंजन'या' कारणामुळे अमिताभ बच्चन यांना जावे लागले पोलीस ठाण्यात

‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांना जावे लागले पोलीस ठाण्यात

Subscribe

मुंबई वाहतूक पोलिसांनी बिग बीवर केलेल्या कारवाईचे मीडिया यूजर्सकडून कौतुक होत आहे.

बाईकवर (Bike) हेल्मेट न घातल्यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) केलेल्या कारवाईनंतर बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन हे पोलीस जीपजवळ उदास आणि टेन्शनमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोला अमिताभ यांनी कॅप्शन दिली की,  ‘अॅरेस्टेड’. या फोटोत अमिताभ बच्चन हे चेक शर्ट आणि काळ्या पँटमध्ये पोलिसांच्या जीपजवळ उभे आहेत. पोस्ट पाहून बिग बींनी हेल्मेटच्या घटनेचा आनंद घेतल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चनच्या पोस्टला झोमॅटोपासून ते चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस

- Advertisement -

अमिताभच्या या मजेशीर पोस्टवर चहत्यांनी कमेंटचा पाऊस पडला आहे. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है| आणखी एका चाहत्याने लिहिले की, सर भूतनाथ यांना कोणीही अटक करू शकत नाही. तिसर्‍या चाहत्याने लिहिले की, चलो तो आखिर में 14 मुल्कों की पुलिस आपको पकड़ने में सक्सेसफुल हुई। यात अमिताभ बच्चन यांच्या चहात्यांबरोबरच फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने कमेंट देखील कमेंट करत म्हटले की, ‘तुम्हाला तिथे जेवणाची डिलिव्हरी करू शकतो का?’, रामायण अभिनेता सुनील लाहिरींनी लिहिले, ‘सर तुम्हाला अटक झाली आहे किंवा तुम्हाला कोणीतरी अटक केली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

अमिताभ यांना 1000 रुपयांचा दंड ठोठावला 

अमिताभ बच्चन यांनी 15 मे रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ते बाईकवर बसलेले दिसत आहे. या फोटोला बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी त्याला ओळखत नाही, पण तरीही त्याने मला मदत केली. पिवळा टी-शर्ट, चड्डी आणि कॅप घातलेल्या या व्यक्तीचे आभार मानून त्याने मला आनंदाने त्याच्या बाईकवर बसवले आणि मी वेळेवर पोहोचलो.” परंतु, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी हेल्मेट न घातल्याबद्दल अमिताभ यांना फटकारले. लोकांनी मुंबई पोलिसांना टॅग केले, यानंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अमिताभला 1000 रुपयांचा दंड ठोठावला.

पोलिसांच्या ‘या’ पावलाचे यूजर्सनी केले कौतुक 

मुंबई वाहतूक पोलिसांच्या या पावलाचे सोशल मीडिया यूजर्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने लिहिले, बॉलिवूड सेलिब्रिटींवरही कारवाई होत असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. हे करण्यासाठी खूप शौर्य लागते. एका यूजरने लिहिले की, मला वाटते की जर बॉलीवूड सेलिब्रिटींनी ट्रॅफिकचे नियम तोडले तर त्यांच्यावरही तितकीच कारवाई व्हायला हवी. नियम सर्वांसाठी समान असावेत.


 

हेही वाचा – ‘तू चीज बड़ी है…’ ब्लू टिक पुन्हा मिळाल्याच्या आनंदात अमिताभ बच्चन यांनी एलॉनसाठी गायले गाणं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -