अभिनेते किरण मानेंवरील कारवाई व्यावसायिक कारणांमुळे, पॅनोरामा एंटरटेनमेंटचे स्पष्टीकरण

किरण माने यांना याबाबत आधी सूचना देण्यात आल्या होत्या.त्याच्या कानावरही काही गोष्टी घालण्यात होत्या मात्र त्याचा काहीही परिणाम न झाल्यामुळे निर्मांत्यांना हे पाऊल उचलावे लागले असे कंपनीने म्हटले आहे.

for commercial reasons star pravah removed Actor kiran mane from mulgi jhali ho serial Explanation of Panorama Entertainment
अभिनेते किरण मानेंवरील कारवाई व्यावसायिक कारणांमुळे, पॅनोरामा एंटरटेनमेंटचे स्पष्टीकरण

अभिनेते किरण माने (kiran mane)  यांनी सोशल मीडिया पोस्टमधून राजकीय वक्तव्य केले म्हणून स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून त्यांना काढून टाकण्यात आले होते असे सांगण्यात येत होते मात्र किरण माने यांच्यावर झालेली कारवाई कोणत्याही राजकीय पोस्टमुळे नाही तर काही व्यावसायिक कारणांमुळे झाल्याचे स्पष्टीकरण मालिकेच्या पॅनोरामा एन्टरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसकडून देण्यात आले आहे. किरण माने यांना याबाबत आधी सूचना देण्यात आल्या होत्या.त्याच्या कानावरही काही गोष्टी घालण्यात होत्या मात्र त्याचा काहीही परिणाम न झाल्यामुळे निर्मांत्यांना हे पाऊल उचलावे लागले असे कंपनीने म्हटले आहे.

किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर फेसबुकवर ‘काँट लो जुबान, आसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!’ अशी पोस्ट केली होती. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात त्यावर अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर वक्तव्य करत असतात. अनेकदा त्यांना त्यांच्या परखड वक्तव्यामुळे ट्रोल देखील केले गेले. मालिकेतून त्यांना काढून टाकल्यानंतर त्यांच्या राजकीय पोस्टमुळे मालिकेतून काढून टाकल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आली. मात्र मालिकेतून त्यांना का काढले याचे त्यांच्याकडेही उत्तर नव्हते. मालिकेतून मला का काढले याचे योग्य उत्तर मला चॅनलकडून अपेक्षित आहे असे किरण माने यांनी एका टीव्ही मुलाखतीत म्हटले होते.

‘कलाकारांची गळचेपी होत असेल तर नक्कीच कारवाई होईल’,किरण माने प्रकरणावर डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रीया

किरण माने यांच्या राजकीय पोस्टमुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले असे सांगण्यात आल्यानंतर कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चॅनेलकडून मुस्कटदाबी होते असल्याचा तीव्र प्रतिक्रीय चाहत्यांकडून येत होत्या. अनेक राजकीय नेत्यांनी देखील किरण माने यांच्या पाठीशी उभे राहिले होते.  महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वाहिनीने आपली चुक सुधारावी’, असा इशारा देखील बाळासाहेब थोरात यांनी स्टार प्रवाह वाहिनीला दिला होता. त्याचप्रमाणे राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकले असेल तर कलाकारांची गळचेपी होत असेल तर त्याचा नक्कीच विरोध होईल’, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.

‘महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही’, बाळासाहेब थोरात अभिनेते किरण मानेंच्या पाठीशी

‘आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो अशी तिरकस पोस्ट मी केली होती. ती पोस्ट लावून धरत आमच्या नेत्याला बोललो असं म्हणत माझ्याविरोधात त्यांनी अक्षरश: स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं आणि मालिकेतून मला काढून टाकण्यात आले, महाराष्ट्रात असं नाही होणार असं मला वाटले कारण अशी झुंडशाही फक्त बिहार-यूपीमध्ये चालू शकते. पण मी देखील याचा बळी ठरलोय. पण मी यातून पुन्हा खंबीरपणे उभा राहीन, असे किरण माने एका मुलाखतीत म्हणाले होते. मात्र आता प्रोडक्शनकडून किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याचे खरे कारण समोर आल्यानंतर अभिनेते किरण माने यावर काय प्रतिक्रीया देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप


हेही वाचा – ‘कलाकारांची गळचेपी होत असेल तर नक्कीच कारवाई होईल’,किरण माने प्रकरणावर डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रीया