घरमनोरंजनरविनाच्या ट्विटचा माध्यमांनी घेतला चुकीचा अर्थ

रविनाच्या ट्विटचा माध्यमांनी घेतला चुकीचा अर्थ

Subscribe

रवीना टंडनने केलेल्या ट्विटचा चुकीचा अर्थ काही माध्यमांनी घेतला आणि तिला ट्रोल केले. त्यावर अन्य नेटिझन्सनेदेखील तिला ट्रोल करायला सुरुवात केली. रवीना टंडन हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली, असं माध्यमांनी म्हटलं. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनात अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका आणि त्यांना जामीनही देऊ नका, अशा प्रकारचं ट्विट रवीनानं केलं असं सांगण्यात आलं.

रवीनानं केलं होतं ट्विट

‘ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आंदोलनाची पद्धत ही खूपच भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणं हे अतिशय वाईट असतं. त्यामुळे अशा आंदोलक शेतकऱ्यांना त्वरीत तुरुंगामध्ये टाका आणि त्यांना जामीनही देऊ नका,’ अशा स्वरुपाचं प्रक्षोभक ट्विट रवीनानं आपल्या ट्विटर हँडलवरून केलं होतं.

- Advertisement -

माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतल्यामुळे रवीनावर झाली टीका

हे ट्विट केल्यानंतर माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला. त्यानंतर नेटिझन्सनेदेखील रवीनाला ट्रोल करायला सुरुवात केली. नेटिझन्सच्या टीकेला रवीनाला सामोरं जावं लागलं. मात्र तरीही बऱ्याच ट्रोलला तिनं उत्तर देत स्वतःची शेतकरी आंदोलनाविषयीची भूमिका सोडली नव्हती.

माध्यमांना टॅग करत दिला सल्ला

आपण जे म्हटलं त्या शब्दांचा वेगळा अर्थ मीडियानं काढला असल्याचं ट्विट केलं. तिने मीडिया हाऊसना टॅग करत आपण जे म्हटलं आहे ते परत नीट वाचण्याचा आणि त्याचा नीट अर्थ लावण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्यांबद्दल असंवदेनशीलता दाखवून त्यांना तुरुंगात डांबण्याची भाषा केल्याबद्दल रवीना टंडनवर सर्वच स्तरावर टीका झाली होती.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -