घरमनोरंजनकॅन्सरशी लढा देणार्‍या चाहत्याच्या भेटीला प्रभास, शूटींग अर्धवट सोडून गाठले रुग्णालय

कॅन्सरशी लढा देणार्‍या चाहत्याच्या भेटीला प्रभास, शूटींग अर्धवट सोडून गाठले रुग्णालय

Subscribe

प्रभासच्या या स्वभावामुळे त्याचे चाहते त्याला डार्लिंग प्रभास म्हणून संबोधतात.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर त्यांच्या चाहत्यांचे किती प्रेम असते हे तर जगजाहीर आहे. पण कलाकार सुद्धा त्यांच्या चाहत्यांवर भरभरून प्रेम करतात. नुकताच दक्षिणात्य सुपरस्टार डार्लिंग प्रभास याने एका फॅनला भेटण्यासाठी चक्क शूटिंग अर्धवट सोडून गेला होता अशी माहिती समोर आली आहे. आणि म्हणूनच प्रभासच्या या स्वभावामुळे त्याचे चाहते त्याला डार्लिंग प्रभास म्हणून संबोधतात.


एका कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर असणार्‍या पिडीत फॅनने प्रभासला भेटण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. प्रभासला ही माहिती कळताच क्षणाचाही विलंब न लावता त्याने चित्रीकरण अर्धवट थांबवले आणि चाहत्याला भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला. बिझनेसमॅन वेम्पा कासी राजू यांनी एका मुलाखती दरम्यान ही माहिती सांगितले आहे. तसेच या भेटी दरम्यान प्रभासने मुलाची विचारपूस केली आणि त्याज्याशी छानपैकी गप्पा मारल्या त्याला कुठेही कधीही भेटण्याचे वचन देखील दिले. कॅन्सर पीडित मुलगा हा २ तासांपेक्षा जास्त वेळ जगू शकणार नाही असे डॉक्टरांनी संगितले होते. पण प्रभासच्या भेटीनंतर १० दिवस त्याच्या आयुष्यात वाढ झाली असे बोलले जाते. प्रभास हा नेहमी दानधर्म करत असतो पण या गोष्टी त्याला जगासमोर उलगडने पसंत नाही. सूत्राद्वारे मिळालेल्या महितीनुसार तो दरवर्षी लाखो रुपये चॅरीटीत देतो. नालागोंडा येथील अंध शाळेला त्याने १० लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – दिग्दर्शक समीर विद्वांसने राहुल गांधीच्या निर्णयाची केली स्तुती,म्हणाले हेच बाकी सर्व पक्षांनी करायला हवं

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -