‘मन्नत’ची सुरक्षा; मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला दिले ‘हे’ निर्देश

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकत्यात काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसणाऱ्या दोन मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हे आरोपी शाहरुखचे चाहते असून त्याला भेटण्यासाठी आल्याचं चौकशीदरम्यान उघड झालं. त्यानंतर या दोघांची 10,000 रुपयांच्या जामीनावर सुटका झाली. मात्र, तरीही हे प्रकरण सध्या चांगलचं चर्चेत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोन आरोपी शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यात मध्यरात्री घुसले शिवाय ते बंगल्यातील तिसऱ्या मजल्यावरील शाहरुखच्या मेकअप रुममध्ये 8 तास लपून शाहरुखची वाट पाहत होते. खूप वेळानंतर शाहरुख तिथे आला आणि त्यांना पाहून त्याला धक्का बसला. त्यानंतर शाहरुखने त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दरम्यान, आता या सर्व प्रकरणानंतर शाहरुख खानला पोलिसांनी बंगल्याचे सिक्युरिटी ऑडिट करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये शाहरुखच्या बंगल्यातील वस्तू चोरीला गेल्या आहेत की नाही यांचा तपास केला जाणार आहे.या दोन तरुणांचा देखील पोलिसांनी तपास केला मात्र, त्यांच्याकडे कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
हे दोन्ही तरुण शाहरुखला भेटण्यासाठी बंगल्यात घुसले होते.

खरं तर, शाहरुख खानचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून सिक्युरिटी ऑडिट करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.


हेही वाचा :

सतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला रवाना; व्हिडीओ व्हायरल