‘भूलभुलैया २’ पासून ते ‘जयेशभाई जोरदार’ पर्यंत असे मोठे चित्रपट मे महिन्यात होणार रिलीज

कियारा अडवाणीच्या 'भुलभूलैया'पासून ते कंगना रनौतच्या 'धाकड'पर्यंत असे बरेच धमाकेदार चित्रपट येच्या मे महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.

लॉकडाउनच्या मोठ्या ब्रेक नंतर आता चित्रपटसृष्टीत धमाकेदार चित्रपटांची चांगलीच चुरस रंगलेली आहे. या एप्रिल महिन्यात बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या अटॅक, KGF-2,जर्सी यांसारखे बरेच चित्रपट रिलीज झाले आणि आता येत्या मे महिन्यातही असेच अनेक दिग्गज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मे महिन्यात कियारा अडवाणीच्या ‘भुलभूलैया’पासून ते कंगना रनौतच्या ‘धाकड’पर्यंत असे बरेच धमाकेदार चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.

मे महिन्यात होणार हे दिग्गज चित्रपट रिलीज
भुलभूलैया २


अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा हा आगामी चित्रपट येत्या २० मे रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हॉरर- कॉमेडी पद्धतीचा असून यामध्ये अभिनेत्री तब्बू आणि राजपाल यादव हे सुद्धा प्रमुख भूमिकेत असतील.

जयेशभाई जोरदार

जयेशभाई जोरदार या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून याचित्रपटामध्ये त्याने जयेशभाई ही व्यक्तीरेखा साकारली आहे. कन्या भ्रूण हत्येला रोकण्याच्या कथेवर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला आहे. हा चित्रपट १३ मे रोजी रिलीज होणार आहे.

 

धाकड


धाकड चित्रपट बॉलिवूडमधील पहिला हाय-ऑक्टेन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसून येईल.तसेच दिव्या दत्ता, अर्जुन रामपाल, शाश्वत चटर्जी सुद्धा दिसून येतील. बिग बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट येत्या २० मे रोजी रिलीज होणार आहे.

रॉकेट गॅंग

रॉकेट गॅंग हा बॉलिवूड चित्रपट येत्या ६ मे रोजी रिलीज होणार आहे, तसेच यामध्ये अभिनेता आदित्य सील आणि अभिनेत्री निकिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसून येतील.

 

 

‘भारत माझा देश आहे’ मधून लाडू करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण