घरमनोरंजनकंगना रनौतपासून लारा दत्तापर्यंत 'या' अभिनेत्रींनी साकारली आहे इंदिरा गांधी यांची भूमिका

कंगना रनौतपासून लारा दत्तापर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी साकारली आहे इंदिरा गांधी यांची भूमिका

Subscribe

कंगना रनौतच्या आधी सुद्धा अनेक अभिनेत्र्यांनी इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या यादीमध्ये सुचित्रा सेन ते लारा दत्ता अश्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा नुकताच काही दिवसांपूर्वी तिच्या ‘इमरजेंसी’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. या चित्रपटामध्ये कंगना रनौत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. कंगानाने शेअर केलेल्या टीझरमध्ये कंगना हूबेहूब इंदिरा गांधी यांच्यासारखे हावभाव साकारताना दिसत आहे. कंगनाने साकारलेली ही भूमिका पाहून अनेकजणांनी तिचं कौतुक केलं आहे. मात्र, कंगना रनौतच्या आधी सुद्धा अनेक अभिनेत्र्यांनी इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या यादीमध्ये सुचित्रा सेन ते लारा दत्ता अश्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.

या अभिनेत्रींनी साकारली इंदिरा गांधी यांची भूमिका

- Advertisement -

कंगना रनौत (इमरजेंसी)

- Advertisement -

‘इमरजेंसी’ चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूक पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत. त्यातील तिचे पांढरे केस, चेहऱ्यावरील सुरकुत्या, दात, चेहऱ्यावरील हावभाव हे सर्व कंगनाने हुबेहुब हेरलं आहे. कंगनाच्या मेकअप आर्टिस्ट आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं जात आहे.

सुचित्रा सेन (आंधी)


१९७५ मध्ये गुलजार यांच्या आंधी चित्रपटावरून खूप गोंधळ झाला होता. या चित्रपटात बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेनने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. दरम्यान, निर्मात्यांनी हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्यावर असण्यास नकार दिला होता.मात्र तरी सुद्धा यावरून खूप गोंधळ उडाला होता.

सरिता चौधरी (मिड नाइट चिल्ड्रन)


मिड नाइट चिल्ड्रन या चित्रपटात सरिता चौधरी या अभिनेत्रीने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.मात्र प्रेक्षकांच्या मते सरिता चौधरी इंदिरा गांधी सारख्या दिसून येत नव्हत्या.

सुप्रिया विनोद (इंदु सरकार)


अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी मधुर भंडारकर यांच्या इंदु सरकार या राजकारणावर आधारित चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.

लारा दत्ता (बेल बॉटम)


गेल्या वर्षी अक्षय कुमारच्या बेल बॉटम चित्रपटामध्ये अभिनेत्री लारा दत्ता हिने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.


हेही वाचा :सुप्रिया पाठारेंच्या मुलाचा ठाण्यातील कोकणीपाडा येथे पावभाजीचा ट्रक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -