करिश्मापासून ते ऐश्वर्यापर्यंत ‘या’ अभिनेत्रींचे आहे आपल्या मुलांसोबत खास बॉन्डिंग

जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत प्रत्येकजण हा दिवस आपल्या आईसाठी समर्पित करतात. खरंतर आपण नेहमीच आपल्या आईसोबत असतो किंवा तिची आठवण काढत असतो. मात्र मदर्स डेच्या दिवशी आपण आपल्या आईला खूश करण्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतो. असाच उत्साह बॉलिवूड कलाकरांमध्ये सुद्धा दिसून येतो. अशाच काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांचे त्यांच्या मुलांसोबत खास बॉन्डिंग आहे. करिश्मा कपूरपासून ते शिल्पा शेट्टी, मान्यता दत्ता, दीया मिर्जापर्यंत अश्या बऱ्याच अभिनेत्री आपल्या मुलांसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

करीश्मा कपूरला दोन मुलं आहेत, ती बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलांसोबतचे खास क्षण शेअर करत असते.

शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या दोन मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. तिचं तिच्या मुलांसोबत खास बॅन्डिंग आहे.

ईशा देओल नेहमी सोशल मीडियावर तिच्या दोन मुली राध्या आणि मायरासोबतचे फोटो शेअर करते, इतकंच नव्हे तर ईशा तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून दूर गेली आहे.

सोहा अली खानसुद्धा अनेकदा तिच्या मुली सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

ऐश्वर्या जिथे कुठे जाते नेहमी तिच्यासोबत तिच्या मुलीला घेऊन जाते. शिवाय बऱ्याच पार्टीमध्ये ऐश्वर्या आणि तिच्या मुलीचा ड्रेस कोड सुद्धा सारखा पाहायला मिळतो.

करीनी कपूरची तैमूर अली आणि जेह खान ही दोन मुलं आहेत. करीना तिच्या कामासोबतचं मुलांना सुद्धा वेळ देताना दिसून येते.

दीया मिर्झाला एक मुलगा आहे, ती अनेकदा तिच्या मुलासोबतचे फोटो शेअर करत असते.

फराह खान सुद्धा अनेकदा तिच्या मुलांसोबते फोटो शेअर करत असते, फराह खानला तीन मुलं आहेत.

 


हेही वाचा :Oops मूमेंटमुळे दीपिका पदुकोण होतेय ट्रोल