‘Samrat Prithviraj’पासून ‘Jug Jugg Jeeyo’पर्यंत जून महिन्यात रिलीज होणार ‘हे’ 7 चित्रपट

मे महिन्यात रिलीज झालेल्या ‘भूलभुलैया 2’ आणि ‘अनेक’ यांसारख्या धमाकेदार चित्रपटांनंतर आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष जून महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडे लागलेले आहे. येत्या जून महिन्यात बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज चित्रपट रिलीज होणार असून या यादीमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘मेजर’, ‘विक्रम’ यांसारखे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.

सम्राट पृथ्वीराज
चित्रपटगृहात ‘बच्चन पांडे’ पूर्णपणे फ्लॉप झाल्यानंतर आता अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ येत्या 3 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या या ऐतिहासिक चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनर खाली बनवण्यात आला आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असून अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटात सम्राट पृथ्वीराज ही मुख्य भूमिका साकारलेली आहे. शिवाय या चित्रपटात मानुषी छिल्लरने संयोगिता ही मुख्य भूमिका साकारलेली आहे. याशिवाय या चित्रपटात सोनू सूद, संजय दत्त,आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तंवर, ललित तिवारी यांच्या सुद्धा प्रमुख भूमिका आहेत.

मेजर
26/11 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ चित्रपट येत्या 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. देशाच्या रियल हीरोवर आधारित या चित्रपटातून पुन्हा एकदा 26/11 च्या भयानक हल्ल्याचे चित्र प्रेक्षकांसमोर येणार आहेत. शशि किरण यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात अदिवी शेष, प्रकाश राज, शोभिता, सई मांजरेकर आणि रेवती मुख्य भूमिका मध्ये दिसून येतील. या चित्रपटाला हिंदी आणि तेलुगू भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

जुग जुग जियो
राज मेहता यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट येत्या 24 जून रोजी रिलीज होणार असून या चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुण धवल सोबतच अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, फेमस यूट्यूबर प्राजक्ता कोली सुद्धा दिसणार आहे.

विक्रम
टॉलिवूड सुपरस्टार कमल हसनचा ‘विक्रम’ चित्रपट येत्या 3 जून रोजी प्रदर्शित होणार असून कमल हसन शिवाय या चित्रपटात विजय सेतुपति, फहद फासिल हे कलाकार सुद्धा दिसून येतील.

जनहित मे जारी
‘जनहित मे जारी’ चित्रपट येत्या 10 जून रोजी रिलीज होणार असून यामध्ये अभिनेत्री नुसरत भरूचाने एका सेक्सगर्लची भूमिका साकारलेली आहे.

अर्ध
टेलिव्हिजन अभिनेत्री रूबीना दिलैक आणि राजपाल यादव यांच्या अर्ध चित्रपट येत्या 10 जून रोजी zee 5 वर रिलीज होणार आहे.

निकम्मा
‘निकम्मा’ चित्रपट येत्या 17 जून रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शिर्ली सेटिया आणि अभिमन्यु दस्सानी मुख्य भूमिकेत दिसून येतील.

 


हेही वाचा :Hambirrao : मुलांना जगणं शिकवायचं तर ‘हा’ चित्रपट दाखवा; कुशल बद्रिकेच्या पोस्टची चर्चा