संजय लीला भंसाळीपासून ते सायरा बानोपर्यंत ‘हे’ कलाकार लावतात स्वतःच्या नावापुढे आईचे नाव

आपल्याकडे अगदी पूर्वीपासून प्रत्येकाच्या नावापुढे वडीलांचे नाव लावलेले असते. बॉलिवूडमध्ये असे काही अनेक कलाकार आहेत जे स्वतःच्या नावापुढे वडीलांचे नाव न लावता आईचे नाव लावतात. आज मदर्स डे निमित्त आपण आपल्या आईचे नाव लावणाऱ्या कलाकारंबद्दल जाणून घेऊ.

मल्लिका शेरावत


बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री मल्लिका शेरावत सुद्धा तिच्या नावापुढे आईच्या आडनावाचा वापर करते. मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा आहे. लांबा तिच्या वडीलांचे आडनाव आहे. तिच्या आईचे नाव संतोष शेरावत आहे. मल्लिकाने तिच्या प्रोफेशनल आयुष्यात आईचे आडनाव लावले आहे.

अदिति राव हैदरी


बॉलिवूड अभिनेत्री अदिति राव हैदरी तिच्या नावापुढे वडीलांचे आणि आईचे नाव लावते. ती तिच्या आईच्या आडनावातील राव आणि वडीलांच्या नावातील हैदरी लावते.

सायरा बानो


अभिनेत्री सायरा बानो सुद्धा तिच्या नावापुढे वडीलांचे किंवा पतीचे नाव न लावता आईचे नाव लावते. सायरा बानो यांच्या वडीलांचे नाव एहसान-उल-हक हे होतं. आणि आईचे नाव नसीमा बानो होतं. परंतु सायरा बानो यांनी त्यांच्या आईचे नाव लावले.

संजय लीला भंसाळी


बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी सुद्धा त्यांच्या नावापुढे आईचे संपूर्ण नाव लावतात.

राइमा सेन आणि रिया सेन


अभिनेत्री राइमा सेन आणि रिया सेन या दोघी बहिणी सुद्धा आपल्या नावापुढे आईचे नाव लावतात. त्या अभिनेत्री मुनमुन सेनच्या मुली आहेत.

कोंकणा सेन शर्मा


अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा तिच्या नावापुढे आई-वडील दोघांचे नाव लावते. कोंकणाच्या वडीलांचे नाव मुकूल शर्मा आहे, तर आईचे नाव अपर्णा सेन आहे. ती दोघांचे आडनाव लावते.

 

 


हेही वाचा :करिश्मापासून ते ऐश्वर्यापर्यंत ‘या’ अभिनेत्रींचे आहे आपल्या मुलांसोबत खास बॉन्डिंग