घरमनोरंजनअरे बापरे! उर्फी जावेदने घातले पूर्ण कपडे; फोटो व्हायरल

अरे बापरे! उर्फी जावेदने घातले पूर्ण कपडे; फोटो व्हायरल

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती अमृतसरच्या गोल्डन टेम्पलबाहेर दिसत आहेत.

संपूर्ण कपड्यात दिसली उर्फी

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

नुकत्याच काही तासांपूर्वी उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये उर्फी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलबाहेर दिसत आहे. यावेळी उर्फीसोबत तिची बहिणदेखील दिसत आहे. यावेळी उर्फी जावेद आणि तिच्या बहिणीने सलवार सूट घातला होता. उर्फी जावेदच्या या पोस्टवर सोशल मीडिया युझर्स प्रतिक्रिया देत आहेत. उर्फी जावेदच्या फोटोंवर युजरने लिहिलंय की, ‘पगली आता रडवशील का?’ तर दुसऱ्या यूजरने लिहिलंय की, ‘अरे देवा, हे काय झालं?’

- Advertisement -

‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री

उर्फीने बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. नुकतेच उर्फीने ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री घेतली होती.


हेही वाचा :

फिटनेस फ्रिक ऐश्वर्या नारकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -