पडद्यामागच्या कलाकारांना तरूण रंगकर्मींची साथ!

एकांकिका मधून पुढे आलेल्या अनेक कलाकारांनी देखील या उपक्रमात सहभाग घेत मदतीचा हात पुढे केला.

नाटक, प्रातिनीधीक

लॉकडाऊन मुळे अनेकांचीच आयुष्य विस्कळीत झाली आहेत. परंतु दिवसाच्या रोजगारावर जगणाऱ्या माणसाचं आयुष्य त्याहूनही कठीण झालं आहे. मराठी रंगभूमीवर सुरु असलेल्या, नाटकातील अचानक बेरोजगार झालेला पडद्यामागील घटक म्हणजे रंगमंच कामगार. म्हणूनच एकांकिका करणारी, नाट्य क्षेत्राशी जोडलेली गेलेली अनेक लोक रंगमंच कामगारांसाठी मदत निधी गोळा करत आहेत. हा मदत निधी उभा करण्यासाठी आता महाविद्यालयीन आणि हौशी कलाकार संस्था ज्या नेहमीच एकांकिका क्षेत्रात काही न काही करत असतात या सुद्धा हातभार लावत असून, सगळ्यांनी एकत्र येऊन हा निधी उभारण्यासाठी उपक्रम हाती घेत तब्बल ५७,२०१ रुपये इतका निधी जमा केला आहे. जमा झालेला निधी अखिल भारतीय नाट्य परिषदेला सुपूर्त करण्यात आला आहे.

रुईया , एम. डी, साठ्ये, डहाणूकर , कीर्ती  आणि एम.सी.सी. या कॉलेजेसची नाट्यमंडळ तसेच ‘वर्क इन प्रोग्रेस कल्याण’ ही हौशी संस्था मदत निधी उभा करण्यासाठी पुढे आल्या आहेत. एकांकिका करताना अनेकांचे हातभार लागतात त्यात अनेकवेळा ही रंगमंच कामगार मंडळी अगदी नाममात्र शुल्क आकारून मदत करतात.  तसेच अनेक कलाकारांनी या योजनेला संपूर्ण पाठींबा दिला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.  निनाद लिमये, रामचंद्र गावकर, प्रल्हाद कुरतडकर, ऋतुजा बागवे, स्नेहल शिदम, मंदार मांडवकर, स्वप्निल टकले, चेतन गुरव राजरत्न भोजने या एकांकिका मधून पुढे आलेल्या अनेक कलाकारांनी देखील या उपक्रमात सहभाग घेत मदतीचा हात पुढे केला.

एकांकिका स्पर्धांना आमने सामने असलेलो आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आमच्यात एक दुवा आहे जो आम्हा सगळ्याना एकत्र आणतो तो दुवा म्हणजे नाटक. अनेक कॉलेज, विद्यार्थी, पालकवर्ग, प्रेक्षक सर्वांचीच साथ लाभली आणि आम्ही इथवर पोहोचू शकलो. त्यांच्यासाठी निधी उभारण हे आमचं कर्तव्य होतच पण तो जेवढा शक्य होईल तेवढा जास्त जमवणे हे महत्त्वाच होत. एकांकिका कलाकार हे पहिल्यांदाच यासाठीच एकत्र आले असून हा उपक्रम फक्त एकदा करून न थांबता तो वर्षभर चालू राहणार आहे.

प्रसाद कांबळी, अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद


हे ही वाचा – सलमानचा नवा शो ‘हाऊस ऑफ भाईजान’, सांगणार सिक्रेटस, लुलीयाही दिसेल शो मध्ये!