FWICE चे मुख्यमंत्र्यांना पत्र, पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू करण्याची केली मागणी!

पोस्ट प्रोडक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची आम्ही पुर्ण काळजी घेऊ व सराकारी नियमांचे पालन केले जाईल असे अश्वासन या पत्रात देण्यात आले आहे.

film shooting

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रातील पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्रातील असंख्य प्रोजेक्ट रखडले आहेत. आपण परवानगी दिल्यास ते पुर्ण होऊ शकतात असे या पत्रात म्हटले आहे.

पोस्ट प्रोडक्शनमध्ये एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग, म्युझिक रेकॉर्डिंग या गोष्टींचा समावेश होतो. कमीत कमी लोकांमध्ये ही कामं पुर्ण केली जाऊ शकतात. यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळू शकतो. त्यांनी त्यांच्या या प्रोजेक्टसाठी बरेच पैसे गुंतवले आहेत. जेणेकरून लॉकडाऊन संपल्यानंतर ते लगेचच त्यांचे प्रोजेक्ट प्रदर्शित करू शकतील. त्याचबरोबर या पत्रात पुढे म्हटले आहे की, पोस्ट प्रोडक्शनमध्ये सहभागी होणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची आम्ही पुर्ण काळजी घेऊ व सराकारी नियमांचे आमच्याकडून पालन केले जाईल.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याचा मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अनेक चित्रपटांची कामं रखडली आहेत. तसेच अनेक चित्रपटांचे पोस्ट प्रोडकश्नचं कामही थांबलं आहे. त्यामुळे या पत्राद्वारे पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू करण्याची मागणी केली आहे. १९ मार्चापासून मालिका, चित्रपट, वेबसिरीजचं शुटींग बंद आहे.


हे ही वाचा – सेवानिवृत्त सासरा सुनेच्या डोक्यावर बंदूक ठेवून करायचा वारंवार बलात्कार!