Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन गदर-2 सिनेमाने जगभरात केली 'ऐवढी' कमाई

गदर-2 सिनेमाने जगभरात केली ‘ऐवढी’ कमाई

Subscribe

बॉलिवूड कलाकार सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेल यांचा सिनेमा गदर-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तीन आठवडे सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि ऐवढ्या कालावझीत सिनेमाने जगभरात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. (Gadar-2 movie worldwide collection)

अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेला गरद-2 सिनेमात काही जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. या सिनेमाची कथा पाकिस्तानात अडकलेल्या मुलाची असून त्याला तेथून सुखरुप परत आणण्यासंदर्भातील आहे. पुन्हा एकदा गरद-2 मध्ये सनी देओल दमदार अॅक्शन अवतारात दिसून येत आहे. 22 वर्षानंतर पुन्हा एकदा तारा सिंह बनून त्याने लोकांची मनं जिंकली आहेत. सिनेमाने देशात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा गाठला आहे. तर जगभरात सिनेमाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

- Advertisement -

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, गदर-2 ने 561.3 कोटींची एकूण कमाई केली आहे. ओवरसीज 53.92 कोटींचे कलेक्शन केले आहे. ऑस्ट्रेलियात सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शन 8 लाख 50 हजार कोटींचे कलेक्शनच्या पार पोहचले आहे. जर्मनीत 65.457 पेक्षा अधिक कमाई केली आहे. अशाप्रकारे न्युझीलँन्डमध्ये सिनेमाने 293,007 पेक्षा अधिक कमाई केली आहे. युएसमध्ये पाहिले तर सिनेमाचे कलेक्शन दोन लाखांपेक्षा अधिक झाले आहे.


हेही वाचा- अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान तब्बल 17 वर्षांनंतर दिसणार एकत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -