Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ‘गदर 2’ चे शूटिंग पूर्ण; 'मैं निकला गड्डी लेके' या गाण्यावर टीमने...

‘गदर 2’ चे शूटिंग पूर्ण; ‘मैं निकला गड्डी लेके’ या गाण्यावर टीमने केला डान्स

Subscribe

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असतील तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.

सध्या ‘गदर 2’चित्रपट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच या चित्रपटाची शूटींग पूर्ण झाल्याची बातमी समोर आली, याचं निमित्ताने चित्रपटाच्या टीमने डान्स केला आहे ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात चित्रपटाची टीम ‘मैं निकला गड्डी लेके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनिल शर्मा यांनी लिहिलंय की, “आज पॅच वर्क शूटचा शेवटचा दिवस आहे. चला एकत्र साजरा करूया. ‘गदर 2’ 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तुम्हीही साजरा करा आणि 9 जून रोजी मोठ्या पडद्यावर ‘गदर: एक प्रेम कथा’ पहा.”

Sunny Deol On 20 Years Of Gadar: The Movie Helped Me Break Out Of Comfort Zone - Filmibeatदरम्यान, हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचे निधन

- Advertisment -