Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'गदर-2' सिनेमा 'ओह माय गॉड-2' वर पडला भारी

‘गदर-2’ सिनेमा ‘ओह माय गॉड-2’ वर पडला भारी

Subscribe

बॉलिवूड मधील खिलाडी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड-2’ ने गदर-2 सिनेमाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तम सिनेमा, स्क्रिप्ट आणि कथा असली तरीही सिनेमाला ओपनिंग डे वेळी भारी नुकसान सहन करावे लागले. खरंतर सनी देओल आणि अमीषा पटले यांचा गदर-2 प्रेक्षकांना अधिक पसंद पडत आहे. त्यामुळे अक्षयचा ओह माय गॉड-2 सिनेमाचे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन कमी झाले आहे.

ओह माय गॉड-2 सुद्धा 2012 मध्ये परेश रावल आणि अक्षय कुमार स्टारकास्ट असलेल्या OMG चा सीक्वल आहे. यावेळी दिग्दर्शनाची जबाबदारी अमित राय यांना मिळाली आहे. या सिनेमाचा रिव्हू उत्तम होता. सिनेमाला चार स्टार्स दिले गेले. परंतु दोन मोठे सिनेमे एकत्रित आल्याने त्याचा कमाईवर परिणाम झाला. गदर-2 ला अॅडवान्स बुकिंगमध्ये 17.60 कोटी रुपयांचा बिझनेस झाला तर ओमजी-2 प्री-रिलीज 3.30 कोटी रुपयांची कमाई केली.

- Advertisement -

ओह माय गॉड-2 प्रदर्शित झाल्यानंतर युजर्सने सेंसर बोर्डावर प्रश्न उपस्थितीत केले होते. खरंतर सेंन्सर बोर्डाने याच्या सर्टिफिकेशन दरम्यान खुप खडाजंगी झाली होती. 27 बदलावासह याला A सर्टिफिकेट दिले गेले. याचा अर्थ असा होतो की, 18 वर्षाखालील लोकांना हा सिनेमा पाहता येणार नाही. मात्र जेव्हा हा सिनेमा मुलांसाठी बनवण्यात आला होता. पण आता त्यांना तो पाहता येणार नाही.

11 ऑगस्टला सनी देओलचा गदर-2 सिनेमा आणि अक्षय कुमारचा ओह माय गॉड-2 एकत्रित प्रदर्शित झाले. अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आलेल्या गदर-2 ने 40 कोटींची बंपर ओपनिग केली. तर ओमएजी-2 ने जवळजवळ 10.26 कोटींची कमाई केली.


- Advertisement -

हेही वाचा- गदर-2 वर भाईजान फिदा म्हणाला….

- Advertisment -