घरमनोरंजन२९ ऑक्टोबरला रंगणार 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१८'

२९ ऑक्टोबरला रंगणार ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१८’

Subscribe

येत्या २९ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता रवींद्र नाटय मंदिरात होणाऱ्या समारंभात रामलक्ष्मण यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात सन्मानाचा दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना घोषित झाला आहे. येत्या २९ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता रवींद्र नाटय मंदिरात होणाऱ्या समारंभात रामलक्ष्मण यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी गायन आणि संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख त्यासोबत मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

आतापर्यंतचे पुरस्कार प्राप्त कलाकार

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांची निवड केली आहे. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.हदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग, श्रीमती पुष्पा पागधरे यांना प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्वाती काळेंचे प्रेक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहान

या पुरस्कार सोहळ्यासोबतच ‘हमसे बढकर कौन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना कमलेश भडकमकर यांची असून विश्वजीत बोरवणकर, ऋषीकेश कामरेकर, मयुर सुकाळे, अमृता नातू, ज्ञानेश्वरी देशपांडे, मुग्धा कराडे हे मुख्य गायक असून आर्चिस लेले, कृष्णा मुसळे, भीसाजी तावडे, विजय जाधव, सागर साठे, अश्वीन रोकडे, वरद कठापूरकर, मनीष कुलकर्णी, नागेश कोळी, राहूल देव हे वादक कलाकार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन समीरा गुजर करणार असून चेतन महाजन हे नृत्यदिग्दर्शन करणार आहेत. पुरस्कारार्थीचा सन्मानार्थ रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचा‍लिका स्वाती काळे यांनी केले आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींना सोल शांतता पुरस्कार जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -