घरमनोरंजनज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी चा आधारवड हरपला :...

ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी चा आधारवड हरपला : सुधीर मुनगंटीवार

Subscribe

गणेश नायडू यांनी ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या सोबतीने हौशी रंगभूमी वर अनेक दर्जेदार नाटके दिली आहेत.

मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू(ganesh naidu) यांच्या निधनाने हौशी रंगभूमी चा आधारवड हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार(sudhir mungantiwar) यांनी आज शोकभावना व्यक्त केली.

ते म्हणाले की, गणेश नायडू(ganehs naidu) यांनी ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या सोबतीने हौशी रंगभूमी वर अनेक दर्जेदार नाटके दिली आहेत. राज्य शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांची अनेक नाटके पारितोषिक प्राप्त ठरली. उत्तम नेपथ्यकार , दिग्दर्शक अशी भरीव कागिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या कौशल्यातुन साकारलेले अनेक नाटकांचे नेपथ्य प्रेक्षकांना भुरळ घालायचे. त्यांनी विदर्भातील हौशी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले.

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार(sudhir mungantiwar) पुढे म्हणाले की श्री.गणेश नायडू यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबियाना देवो व त्यांच्या पुण्यात्म्याला सद्गती प्राप्त होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -