घरमनोरंजनGaneshostav 2021 : बिग बींनी चाहत्यांसोबत शेअर केली लालबागच्या राजाची पहिली झलक

Ganeshostav 2021 : बिग बींनी चाहत्यांसोबत शेअर केली लालबागच्या राजाची पहिली झलक

Subscribe

.लालबागचा राजाच्या दर्शनाला भाविकांची प्रचंड गर्दी असते. अनेक मोठ-मोठे स्टार्स लालबागचा राजाच्या भेटीला आवर्जून येतात.

मुंबईतील (mumbai Ganeshostav)गणेशोत्सवाचा थाटच निराळा असतो.(Ganeshostav 2021) अनेक मानाच्या गणपतीची लगबग येथे पाहायला मिळते.दरम्यान, गणरायाचे आगमन अवघ्या काही तासातच होणार असून गजाननाच्या स्वागतासाठी भक्त देखील सज्ज झाले आहे.( lalbaugcha raja) टाळ मृदुगांच्या गजरात भक्तीभावने तल्लीन होऊन भक्तगन आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करतात. नुकतच मुंबईतील नवसाला पावणाऱ्या लालबागचा राजाची पहिली झलक( lalbaugcha raja darshan) भाविकांना दाखवण्यात आली आहे. दरम्यान बॉलिवूडचे(bollywood) महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan)यांनी सुद्धा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत लालबागचा राजाच्या पहिल्या दर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाविकांची रेलचेल दिसून येत असून बाप्पासमोर असणारा लाल रंगाचा पडदा हळूहळू वर जात आहे आणि यानंतर दर्शन होते लालबागच्या राजाचे अत्यंत सुबक आणि सुंदर असे गणरायाचे दर्शन झालेले पाहायला मिळते.”ॐ गण गणपतये नमः .. Ganpati Bappa Morya .. पहला दर्शन , लालबागचा राजा” असं कॅप्शन देत बिग बींनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.पण अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ जुना असल्याचे कळतेय.(ganesh utsav 2021 amitabh bachchan shared first glimpse of lalbaugcha raja)

व्हिडिओ पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

1934 पासून मुंबईतील चिंचपोकळी येथे लालबागच्या राजाची स्थापना झाली होती. नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे.लालबागचा राजाच्या दर्शनाला भाविकांची प्रचंड गर्दी असते. अनेक मोठ-मोठे स्टार्स लालबागचा राजाच्या भेटीला आवर्जून येतात. मात्र कोरोनाचा प्रभाव अद्याप कमी झाला नसल्यामुळे यंदा भाविकांना लाडक्या लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन घ्यावं लागणार आहे.


हे हि वाचा – Ganeshostav 2021 : ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत बप्पाचं जल्लोषात आगमन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -