Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Ganeshostav 2021 :'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेत रंगणार गणेशोत्सव विशेष भाग

Ganeshostav 2021 :’रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत रंगणार गणेशोत्सव विशेष भाग

कोकणातील गणेशोत्सव हा आपल्यामध्येच एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवू शकतात.

Related Story

- Advertisement -
झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले आणि गाव गाता गजाली या मालिकांमुळे प्रेक्षकांना कोकणच्या सौंदर्याने अधिक भुरळ घातली आणि हे कोकण ज्यांचा नजरेने टिपलं ते कॅमेरामन गणेश कोकरे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत सेट वर हसत खेळत अनेक दृश्य टिपणार्या गणेश कोकरे ह्यांनी कोकणातल्या गणेशोत्सवाच चित्रीकरण करताना असाच एक आगळा वेगळा प्रयोग केला. कोकणातली परंपरा असणाऱ्या फुगड्या चित्रित करताना छाया चित्रकार गणेश कोकरे ह्यांनी एका हातात कॅमेरा आणि तर दुसऱ्या हाताने कलाकारांसोबत फुगडी घालून चित्रीकरण केलं. ज्यामुळे उत्तम चित्रीकरण झालच शिवाय एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद सगळ्यानाच मिळाला आणि हा आनंद तुम्हाला अनुभवता येणार आहे.(Ganeshotsav special episode in ‘Ratris Khel Chale 3’ series)
रात्रीस खेळ चाले 3 च्या गणपती विशेष भागात. इतकंचं नव्हे कोकणातील गणेशोत्सव हा आपल्यामध्येच एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवू शकतात. या विशेष भागांमध्ये भजन देखील प्रेक्षक पाहू शकतील.मराठी टेलिव्हिजनवरील रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्य़ावर उचलून धरले. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, सुशल्या या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या यशामुळे रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि अल्पवधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रकरणावर निर्बंध लादण्यात आलेहोते. त्यामुळे तिसऱ्या सिझनच्या सुरु होताच त्याला ब्रेक लागला. यामुळे रात्रीस खेळ चाले ३ मालिकेचं चित्रीकरण पूर्णपणे बंद करण्यात आलं होत. मात्र आता निर्बंध हटवल्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.


हे हि वाचा – बिग बींनी चाहत्यांसोबत शेअर केली लालबागच्या राजाची पहिली झलक

- Advertisement -