घरताज्या घडामोडी9 years of 'Gangs of Wasseypur': ९ वर्षांपूर्वी 'गँग्स ऑफ वासेपुर'मधून विक्की...

9 years of ‘Gangs of Wasseypur’: ९ वर्षांपूर्वी ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून विक्की कौशलने करिअरला केली सुरुवात

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि चर्चेत असणार दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या बहुचर्चित ‘गँग्स ऑफ वासेपुर’ (9 years of ‘Gangs of Wasseypur’) चित्रपटाला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. मनोज वाजपेयी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अशी जबरदस्त स्टार कास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटाशी अभिनेता विक्की कौशलचे कनेक्शन आहे, हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण ‘गँग्स ऑफ वासेपुर’ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने याबाबत पाहणार आहोत.

या चित्रपटातून अभिनेता विक्की कौशलने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची (असिस्टंट डायरेक्टर) भूमिका विक्की कौशलने निभावली होती. तर त्याचे वडील शाम कौशल अ‍ॅक्शन डायरेक्टर होते. शिवाय विक्कीने चित्रपटात एक भूमिका देखील केली होती. याबाबत स्वतः विक्की कौशलने सांगितले आहे.

- Advertisement -

मिड डे (MIDDAY)शी बातचित करताना विक्की म्हणाला होता की, ‘नगमा खातून (ऋचा चड्ढा) एका वेश्यागृहात जाते, तो हा सीन आहे. शेवटच्या वेळात सर्व ज्युनिअर कलाकार, ज्यांना आम्ही बनारसमध्ये भेटलो होतो, त्यांनी त्या सीनमध्ये भाग घेण्यास नकार दिला, जेव्हा त्यांना कळाले की, हे एक वेश्यालय आहे. जेव्हा सर्व ज्युनिअर कलाकार मागे हटले, तेव्हा सर्व डायरेक्शन टीमला यासाठी एकत्र उभे राहावे लागले. यामध्ये मी एक सावली होता, तुम्ही खिडकीच्या ग्रीलच्या मागे पाहू शकता. ओव्हर अॅक्टिंग करत असताना, जेव्हा नगमा खातून सरदार खानला (मनोज वाजपेयी) शिव्या देत असते. तेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा समोर काम केले होते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

‘गँग्स ऑफ वासेपुर’नंतर विक्की कौशलने काही चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या. त्यानंतर विक्कीला ‘मसान’मध्ये प्रमुख भूमिका साकारायला मिळाली. या चित्रपटात विक्कीने दीपक ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘मसान’ चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला होता. यानंतर विक्कीने ‘जुबान’, ‘रमन राघवन २.०’, ‘उरी’, ‘राझी’ यासारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका पार पाडली.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -