घरताज्या घडामोडीAlia Bhatt: 'ढोलीडा'वर आलियाचे जबरदस्त ठुमके! गंगूबाईचं नवं गाणं रिलीज

Alia Bhatt: ‘ढोलीडा’वर आलियाचे जबरदस्त ठुमके! गंगूबाईचं नवं गाणं रिलीज

Subscribe

बुधवारी ढोलीडा या गाण्याचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्यात आलियाची सिग्नेचर स्टेप अर्ध्यावर दाखवण्यात आली होती आणि या गाण्याची आतुरता आणखी वाढवली होती. अखेर आज आलियाचे हे धम्माकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

बॉलिवूड डिरेक्टर संजय लीला भन्साली आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुप्रतिक्षीत गंगूबाई काठियावाडी (gangubai kathiawadi ) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. २५ फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. मात्र सिनेमाच्या रिलीज आधी भन्साली यांनी प्रेक्षकांना एक सप्राइज दिले आहे. गंगूबाई काठियावाडी या सिनेमातील ढोलीडा हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे ज्यात आलिया भट्ट जबरदस्त ठुमके देताना दिसत आहे. आलियाच्या भन्नाट डान्सने तिच्यावर चांगलेच फिदा झाले आहे.

हातातील बांगड्याचा चुडा घट्ट करत गंगूबाईच्या स्टाइलने नमस्कार करत आलियाची एंट्री होते. साडी कंबरेला खोचून आलियाचा दमदार डान्स सुरू होतो. संजय लीला भन्साली यांच्या प्रत्येक सिनेमात सर्वांना ठेका धरायला लावणारं एक गाणं असतच. गंगूबाई काठियावाडी सिनेमातील हे गाणं देखील नक्कीच गाजणार यात काही शंका नाही. ट्रेलरमध्ये ही आलियाच्या गाण्याची एक झलक दाखवण्यात आली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांना या गाण्याची आतुरता होती. बुधवारी ढोलीडा या गाण्याचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्यात आलियाची सिग्नेचर स्टेप अर्ध्यावर दाखवण्यात आली होती आणि या गाण्याची आतुरता आणखी वाढवली होती. अखेर आज आलियाचे हे धम्माकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

- Advertisement -

गंगूबाई काठियावाडी या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या सिनेमाप्रती असलेल्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. २५ फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. प्रसिद्ध पत्रकार एस हुसैन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.


हेही वाचा – गंगूबाई काठियावाडी यांची खरी कहाणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -