गंगुबाईच्या रूपातला आलियाचा लक्षवेधी लूक प्रदर्शित

आलीया भट्टचा ब्रम्हास्त्र चित्रपटाबरोबरच आणखी एका चित्रपट चर्चेत आहे. तो चित्रपट म्हणजे ‘गंगुबाई काठीयावाडी’. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगुबाई काठीयावाडी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट मुख्य भुमिकेत आहे म्हटल्यावर चित्रपटाविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे. नुकताच या चित्रपतील आलीयाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ११ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनाभोवती ही कथा फिरते. गंगुबाईला लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. मात्र त्यांनी त्यांच संपूर्ण जीवनच बदलून टाकलं. गंगुबाई इथल्या महिलांना आर्थिक मदत करतात, त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठीही लढा देतात. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सगळं या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

नुकताच या चित्रपटाचा आलियाचा पहिला लूक समोर आला आहे. यामध्ये आलीया एका भिंतीला टेकून बसलेली दिसतेय. तर दुसरीकडे तिच्याच बाजूला एक बंदूकदेखील ठेवल्याचं दिसून येत आहे. तसंच तिने आणखी एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. यात तिच्या डोळ्यात राग दिसत आहे. आलियाच्या फर्स्टलूकमधून ती या भुमिकेला पुर्ण न्याय देणार याची खात्री पटते. हा चित्रपट आलियाच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

View this post on Instagram

Gangubai ❤

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटसाठी प्रथम प्रियांका चोप्राला दिग्दर्शकांची पसंती असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता संजय लीला भन्साळी यांनी आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार या विषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.