घरताज्या घडामोडी'Gangubai Kathiawadi' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; गंगूबाईंची बदनामी केल्याचा कुटुंबीयांचाच आरोप

‘Gangubai Kathiawadi’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; गंगूबाईंची बदनामी केल्याचा कुटुंबीयांचाच आरोप

Subscribe

मुंबई येथील कामाठीपुरा या रेड लाईट एरियामद्ये राहणाऱ्या लेडी डॉन गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गंगुबाई काठीयावाडी असं या सिनेमाचं नाव असून अभिनेत्री आलिया भट्टने साकरलेल्या गंगुबाईच्या भूमिकेचं सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई येथील कामाठीपुरा या रेड लाईट एरियामद्ये राहणाऱ्या लेडी डॉन गंगुबाई काठियावाडी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येत्या 25 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गंगुबाई काठीयावाडी असं या सिनेमाचं नाव असून अभिनेत्री आलिया भट्टने साकरलेल्या गंगुबाईच्या भूमिकेचं सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. मात्र, सिनेमा आणि वाद हे काही आता बॉलिवूड साठी नवं राहिलं नाही आहे. गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या रिलीजमध्ये देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या सिनेमात करण्यात आलेले चित्रण हे वास्तवाला सोडून दाखवण्यता आलं असल्याचा आरोप हा गंगुबाई काठीयावाडीच्या कुटुंबियांनी केला आहे.

गंगुबाई यांना त्यांच्या प्रियकराने फसवून विकले नव्हते तर…

लेखक एस. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन इन मुंबई या पुस्तकावर आधारित संजय लीला भंन्साळी दिग्दर्शित सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमात आलिया भट्ट ही प्रमुख भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर आणि टिजर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सर्वांनीच यांच भरभरून कौतूक केलं. मात्र या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टीवर गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. गंगुबाई यांना त्यांच्या प्रियकराने फसवून विकले नसल्याचा माहिती गंगुबाईची यांची मुलगी बबीता गैडा यांनी दिली आहे. त्यामुळे गंगुबाई यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची फार आवड होती, त्यामुळे त्या स्वतःहून गुजरात येथील आपल्या घरातून पळून आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या कामाठीपुरा परिसरात वास्तव्यास होत्या. मात्र त्यांनी स्वतःहून वेश्याव्यवसाय कधीही केला नसल्याचेही बबीता यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

…म्हणून गंगूबाईंनी मुंबईच्या माफीया डॉनची भेट घेतली

बबी कामाठीपुरा परिसरामध्ये गंगुबाई राहत होत्या त्यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालायचा. येथील महिलांना त्याकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागते असे, याचदरम्यान महिलांवर अत्याचार देखील होत होते. मात्र, त्याविरोधात गंगुबाई यांनी संघर्ष करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांच्या नातू विकास गौडा यांनी देखील गंगुबाई यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी त्यावेळीचा मुंबईचा माफिया डॉन करीम लाला यांची भेट घेऊन मदत मागितीली. करीम लाला हे गंगुबाई यांना आपली बहिण मानत असे.त्यामुळे त्यााकाळात गंगुबाई यांच्यासह महिलांवरील अत्याचार हे थांबून त्यांना न्याय मिळाला.

सिनेमाच्या माध्यमातून गंगूबाईंची बदनामी

विकास गौडा यांनी एस. हुसेन झैदी यांनी पुस्तकात गंगुबाई यांच्या व्यक्तीमत्वावर केलेल्या लिखाणाविरोधात आक्षेप नोंदवला आहे. सिनेमावीरोधात अखिल पद्मशाली समाज ट्रस्ट मुंबई या तेलगु समाच्या संघटनाने देखील आक्षेप नोंदवला आहे. तेलगू समाजातील कष्टकरी श्रमिक कामगारांमुळे कामाठीपुरा ओळखला जातो. त्याची खरी ओळख पूसून त्यांची बदनामी या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.दरम्यान आता यावर सिनेमा मेकर्स कडून अद्याप तरी काही स्पष्टीकरण दिलेले नाही. येत्या 25 फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण थेएटर्समध्ये रिलीज होणार आहे.

- Advertisement -


हे ही वाचा – पुणे पालिका धक्काबुक्कीप्रकरणी किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला, पुणे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -