Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 68 व्या फिल्मफेअरमध्ये आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'ला मिळाले 'हे' पुरस्कार

68 व्या फिल्मफेअरमध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला मिळाले ‘हे’ पुरस्कार

Subscribe

सध्या बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड चांगलाच चर्चेत आहे. गुरुवारी रात्री हा सोहळा पार पडला. अनेक कलाकारांनी अनेक अवॉर्ड्स जिंकले. अशातच आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाने एकूण 6 अवॉर्ड्स पटकावले. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा अवॉर्ड्स आलियाने पटकावले. काल पार पडलेला हा सोहळा रात्री 28 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवर प्रासारित होणार आहे.

68 व्या फिल्मफेअरमध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला मिळाले ‘हे’ पुरस्कार

68 व्या फिल्मफेअरमध्ये आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सोबतच सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट डायलॉग, सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइन, सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी, सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी हा देखील पुरस्कार मिळाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट माफीया क्वीन गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात आलियाने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

- Advertisement -

 


हेही वाचा :

विवेक अग्निहोत्रींनी दिला फिल्मफेअर अवॉर्ड्स घेण्यास नकार

- Advertisment -