Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava : सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला, गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आरोप

Chhaava : सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला, गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आरोप

Subscribe

छत्रपती संभाजी महाराज कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे औरंगजेबाच्या तावडीत सापडल्याचे छावा चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मात्र गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. प्रदर्शनापासून चित्रपटाचा कमाईचा वेग दिवसागणिक वाढत आहे. या चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपट कित्येकांसाठी भावनिक विषय ठरला आहे. या चित्रपटाला दिवसेंदिवस प्रसिद्ध मिळत असून सोशल मीडियावर छावा चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटाबाबत वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे औरंगजेबाच्या तावडीत सापडल्याचे छावा चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मात्र गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप केला आहे. (Ganoji Shirke descendants allege that the film chhaava depicts wrong history in the name of cinematic labyrinth)

छावा चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्यासंदर्भात दाखवण्यात आलेल्या प्रसंगावर  आक्षेप घेत गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि शिर्के कुटुंबीयांचे वंशज अमित राजे शिर्के, किशोर राजे शिर्के आदींनी आज (21 फेब्रुवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना संबंधित घटनांचे पुरावे, संदर्भ दाखवण्यासाठी नोटीस बजावली आहे.

हेही वाचा – Vicky Kaushal : कठोर परिश्रम, जखमांच्या खुणा.. असा मिळाला उतेकरांना छावा

चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांचा प्रसंग दाखवण्यापूर्वी दिग्दर्शक उतेकर यांनी आमच्या घराण्याशी चर्चा करणे अपेक्षित होते, पण त्यांनी तसे काहीही झाले नाही. त्यामुळे आता त्यांनी आमच्या घराण्याशी संबंधित बदनामीकारक प्रसंग चित्रपटातून काढून टाकावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दीपक शिर्के यांनी दिला आहे. गणोजीराजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र त्यानंतरही असे प्रसंग दाखवून आमच्या घराण्यावर आरोप कसे केले जात आहेत? इतिहास गायब केला जात आहे. आम्ही या चित्रपटाच्या विरोधात नाही, मात्र खलनायक चुकीचा दाखवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गणोजीराजे शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठावठिकाणा सांगितला नाही, असा दावा यावेळी शिर्के यांनी केला.

दीपक शिर्के म्हणाले की, छावा चित्रपटात शंभूपत्नी महाराणी येसूबाई यांचे थोरले बंधू श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांना फितूर दाखवले आहे. मात्र याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना शिर्के घराण्याची चित्रपटातून बदनामी केली जात आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक या दोघांचाही आम्ही निषेध करतो. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली त्यांनी चुकीचा इतिहास दाखवला आहे, असा आरोप दीपक शिर्के यांनी केला.

हेही वाचा – Chhaava 2 : छावा 2 येणार, शंभूराजांची अधुरी कहाणी पूर्ण होणार