दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं मागच्या महिन्यात 15 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला होता. गेल्या आठ महिन्यांपासून रवींद्र महाजनी हे तिथे एकटेच राहत होते. तसचं, त्यांचा मृतदेह सापडण्याच्या तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनीला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यानं यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. आता पुन्हा एकदा गश्मीर महाजनी याचं एक उत्तर प्रचंड चर्चेचा विषय ठरलं आहे. (Gashmeer Mahajani new post on Instagram answer to fan at Ask Gashmeer session pup)
दुर्दैवानं आईकडून अधिक प्रेम होतं
रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी. रवींद्र महाजनींच्या निधनानंतर माधवी यांनी तब्येत खराब झाली. गश्मीर आईला सावरताना दिसला. पतीच्या निधनामुळे त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. मागच्या अनेक वर्षांपासून रवींद्र महाजनी हे कुटुंबापासून वेगळे राहत होते. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गश्मीर महाजनी याने इन्स्टाग्रामवर आस्क गश्मीर हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. सर तुमच्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज? मधू मॅडम सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा आल्या? असा प्रश्न एका चाहत्यानं विचारला. यावर गश्मीर उदास होत म्हणाला, लव्ह मॅरेज.. पण दुर्दैवानं अगदी मनापासून फक्त प्रेम तिनेच केलं.
वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट
वडिलांचं निधन झाल्यानंतर होणाऱ्या चौफेर टीकेवर उत्तर देताना, महाजनी यानं एक पोस्ट शेअर केली होती. तो म्हणाला होता की, अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्यानं अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो.
आपल्यातून निघून गेलेल्या या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्की बोलेनच, अशी पोस्ट गश्मीर महाजनीने केली आहे.
(हेही वाचा: विक्की कौशलचा भाऊ आणि कतरिनाची बहिण करताहेत एकमेकांना डेटिंग? )