गश्मीर महाजनी इमलीची मालिका सोडणार, निर्मात्यांनी शोधला नवा पर्याय

अभिनेता गश्मीर महाजनी महिन्याच्या अखेरीस त्याच्या शेवटच्या दृश्यांसाठी शूटिंग करत आहे. विशेष म्हणजे तो मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कथेत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर एका रात्रीत घडलेले नाही, तर गश्मीर यानं काही आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला होता.

Gashmir Mahajani will release a serial 'Imali', the producers have discovered a new option
गश्मीर महाजनी इमलीची मालिका सोडणार, निर्मात्यांनी शोधला नवा पर्याय

आदित्य (गश्मीर महाजनी) आणि इमली (सुंबूल तौकीर खान) यांचे आयुष्य एका टीव्ही मालिकेत एक जबरदस्त यू-टर्न घेणार आहे. इमलीची मालिका ही आजकाल टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पसंतीची मालिका बनलीय. आता लवकरच आपली आवडती व्यक्तिरेखा आदित्य कुमार त्रिपाठी या मालिकेतून गायब होणार आहे, अशी बातमी समोर येतेय.
होय, अभिनेता गश्मीर महाजनी याने मालिकेतून बाहेर पडण्यासाठी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अभिनेता गश्मीर महाजनी महिन्याच्या अखेरीस त्याच्या शेवटच्या दृश्यांसाठी शूटिंग करत आहे. विशेष म्हणजे तो मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कथेत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर एका रात्रीत घडलेले नाही, तर गश्मीर यानं काही आठवड्यांपूर्वी राजीनामा दिला होता. निर्माते त्याला राजीनामा मागे घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत होते, कारण ते मालिकेचा चेहरा आहेत आणि ट्रॅक त्याच्यावर आणि सुंबूल तौकीर खानवर केंद्रित आहे. पण अनेक प्रयत्न व्यर्थ गेले, कारण निर्माता गुल खान हा गश्मीरने ठेवलेल्या काही अटी मान्य करू शकला नाही.

म्हणून गश्मीर महाजनी इमली मालिका सोडणार?

मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच हे अगदी स्पष्ट झाले होते की, गश्मीर त्याच्या मराठी चित्रपट आणि वेब शोसह इमलीचे शूटिंग सुरू ठेवणार आहेत, ज्यासाठी निर्मात्यांनी सहमती दर्शविली होती. पण जसजशी कथा पुढे सरकत गेली आणि मालिका चांगली चालू लागली, त्यामुळे गश्मीरला इतर प्रकल्प हाती घेता आले नाहीत. त्याने कथितरीत्या निर्मात्यांना त्याच्या सीक्वेन्सच्या शूटिंगसाठी महिन्यातून फक्त 10 दिवस दिले जे पुरेसे नव्हते. बऱ्याच चर्चेनंतर अखेर गश्मीरने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचा शेवटचा दिवस जानेवारीच्या मध्यात असेल.

गश्मीर महाजनी यांच्या रिप्लेसमेंटसाठी शोध सुरू

निर्मात्यांनी आधीच रिप्लेसमेंट शोधण्यास सुरुवात केलीय, यासाठी एका अभिनेत्याला जवळजवळ निश्चित केलेय. दरम्यान, मालिकेचं केंद्रबिंदू गश्मीरकडून फहमानकडे वळवण्यात येणार आहे.

पुन्हा एकदा नवा प्रवेश

विशेष म्हणजे आदित्यने मालिनीवर आंधळा विश्वास ठेवून लग्न केले. मात्र, आता मालिनीचे खरे वास्तवही समोर आले. दुसरीकडे इमलीने तिचे करिअर आणि सर्व काही सोडून आदित्यची निवड करण्यास नकार दिला. अशा प्रकारे आर्यन या दोघांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात असून, कथा पुन्हा नवीन वळण घेणार आहे. खरं तर, आदित्य आणि इमली या दोघांना आर्यन एका दहशतवाद्याची मुलाखत घेण्यासाठी पाठवतो. आता गश्मीरनं मालिका सोडल्यानंतर मोठे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. स्टार प्लसच्या सीरिअलमध्ये दहशतवादी म्हणूनही नव्याने एन्ट्री होणार आहे. आदित्य उर्फ ​​गश्मीर महाजनी आता बाहेर पडल्याने इमलीचे पात्र बदलेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा – Coronavirus : अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण