बाळाच्या जन्मानंतर गौहर खानने 10 दिवसात घटवले 10 किलो वजन; चाहते झाले अवाक्

गौहरने 10 मे रोजी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. गौहर आणि जैद दरबारने सोशल मीडियावर त्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी देत एक नोट पोस्ट केली होती.

टीव्ही आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौहरने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे. यानंतर अवघ्या 10 दिवसात गौहरने 10 किलो वजन कमी केले आहे. गौहरने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौहरचे Transformation पाहून तिचे चाहते अवाक झाले आहेत. गौहरचे Transformation पाहून तिचे चहात्यांनी तिला प्रश्न विचारला की, एवढ्या कमी दिवसात वजन कसे कमी केले.

गौहरने 10 दिवसात 10 किलो वजन कमी केले आहे. गौहरने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये (Instagram story) बूमरँग व्हिडिओ टाकला होता. यात ती नाईट सूटमध्ये दिसत असून खूप स्लीम दिसत आहे. या स्टोरीला गौहरने कॅप्शन दिले की, ‘अजून 6 किलो वजन कमी करायचे आहे. न्यू मॉम लाईफ’

गौहरने 10 मे रोजी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. गौहर आणि जैद दरबारने सोशल मीडियावर त्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी देत एक नोट पोस्ट केली होती. या नोटमध्ये लिहिले की, ‘आम्हाला मुलगा झाला आहे. त्यांच्या येण्याने आम्हाला खरा आनंद काय असतो, याची जाणीव करून दिली. आम्ही आभारी आहोत, नवीन पालक जैद आणि गौहर’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

लॉकडाऊनमध्ये किराना सामान खरेदी करताना झाली भेट

लॉकडाऊनमध्ये किराना सामान खरेदी करताना दोघांची पहिली भेट झाली. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले. गौहर आणि जैदने 25 डिसेंबर 2020 मध्ये विवाह केला.