घरमनोरंजनगौहर खानच्या वडिलांचे प्रदीर्घ आजाराने निधन

गौहर खानच्या वडिलांचे प्रदीर्घ आजाराने निधन

Subscribe

गौहर खानचे वडिल काही दिवसांपासून रुग्णालयात भरती होते. व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून तिच्या वडिलांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शुक्रवारी ५ मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून गौहरचे वडील रुग्णालयात भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गौहरने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला काही फोटो शेअर करत तिचे वडिल रुग्णालयात असल्याचे सांगितले होते. वडिल बरे व्हावेत म्हणून ती दिवसरात्र प्रार्थना करत होती व ‘ माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा’ असे चाहत्यांना आवाहनही तिने केले होते. मात्र अखेर आता गौहरच्या वडिलांची प्राणज्योत मालवली आहे.

गौहरखानची मैत्रिण प्रीती सिमोस हिने सोशल मीडियाद्वारे गौहरच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौहरच्या वडिलांचा व्हिडिओ शेअर करताना, माझ्या गौहरचे वडील..ज्यांच्यावर माझे प्रचंड प्रेम होते..ज्यांनी त्यांचे आयुष्य अभिमानाने जगले..असे कॅप्शन देवून तिने गौहरच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preeti Simoes (@preeti_simoes)

- Advertisement -

 तर यानंतर दुसरा फोटो तिने शेअर केला होता त्यात तिने माय लाइफलाइन असे म्हणून वडिलांच्या हातावर हात ठेवून फोटो शेअर केला होता. गौहर तिच्या वडिलांची खूप लाडकी होती. नूकताच तिच्या लग्नातील एक सुंदर फोटो गौहरने शेअर केला होता. गौहरच्या लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या वडिलांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. वडिलांच्या आजारपणामुळे गौहर प्रचंड तणावाखाली होती तरीही पित्याच्या सेवेत तिने स्वत:ला वाहून घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

- Advertisement -

हे वाचा- शुभांगी सदावर्ते साकारणार ‘नवे लक्ष्य’ मालिकेत पीआयची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -